32 C
Gondiā
Tuesday, June 23, 2026
Home विदर्भ मौशिखांब येथे झाडीबोली साहित्य संमेलन आजपासून

मौशिखांब येथे झाडीबोली साहित्य संमेलन आजपासून

0
44

गडचिरोली,दि.28ः- झाडीबोली साहित्य मंडळाच्यावतीने मौशिखांब येथे २८ व २९ डिसेंबरदरम्यान ‘झाडीबोली साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे.उद््घाटन आ.डॉ.देवराव होळी यांच्याहस्ते होईल. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी भंडाराचे साहित्यिक डॉ.गुरुप्रसाद पाकमोडे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष लखनसिंह कटरे, डॉ.राजाभाऊ मुनघाटे, पत्रकार महेश तिवारी उपस्थित राहतील.
पहिल्या दिवशी सकाळी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात येईल. यामध्ये मेघनाद भजन मंडळ, लेझिम पथक, बॅंड पथक व नागरिक सहभागी होतील. उद््घाटनानंतर पहिल्या सत्रात झाडीबोली साहित्य पुरस्काराचे वितरण होणार आहे. तसेच एकूण ११ पुस्तकांचे प्रकाश करण्यात येणार आहे. दुसर्‍या सत्रात ‘आमी बोलीत लिवतून’ या विषयावर चर्चासत्र होईल. अध्यक्षस्थानी साहित्यिक राजन जयस्वाल राहतील. सत्रात अंजना खुणे, दिवाकर मोरस्कर, बापुराव ढोंगे, एकनाथ बुध्दे, मुरलीधर खोटेले आदी सहभागी होणार आहेत. सायंकाळी दंडार, रात्री ८ वाजता कविसंमेलन होणार आहे. अध्यक्षपदी मिलींद रंगारी राहतील. दुसर्‍या दिवशी २९ डिसेंबरला सकाळी ९ वाजता ‘झाडीबोली मराठीची आजी’ या विषयावर चर्चासत्र होईल.