गोरेगाव,दि.30 -तिरोडा मार्गाने धावणाNया रेती तस्करांच्या टिप्परने कोडेबर्रा गावशिवारात दुचाकीला जबर धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार दोघांचा मृत्यू झाला. तर एक जण
गंभीर जखमी झाला आहे. ही घटना (दि.२९) सकाळी ११ वाजता सुमारास घडली. छोटेलाल कान्हु मुलताम (४०),शिवदास शोभेलाल टेकाम (३०) दोन्ही रा.कोडेबर्रा असे मृतांची नावे आहेत. तर गंभीर जखमी खेमराज अनंतराम गेडाम (२७) रा.कोडेबर्रा याला उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय तिरोडा येथे दाखल करण्यात आले आहे.
गोरेगाव – तिरोडा या मार्गाने मोठ्या प्रमाणात जड वाहनाच्या माध्यमातून रेतीची वाहतूक केली जाते. टिप्पर क्र.एमएच-३५/एजे-९२९२ गोरेगावकडून तिरोडाकडे जात असताना चालकाने लापरवाहीने चालवून समोरून येणाNया दुचाकी क्र.एमएच-३५/एल-९६९९ ला जबर धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार छोटेलाल मुलताम याचा घटनास्थळीच
मृत्यू झाला तर शिवदास शोभेलाल टेकाम (३०) व खेमराज अनंतराम गेडाम (२७) हे दोघे गंभीर जखमी झाले.




