24.4 C
Gondiā
Monday, July 6, 2026
Home Top News महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 36 मंत्र्यांनी घेतली शपथ

महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 36 मंत्र्यांनी घेतली शपथ

0
53

मुंबई,दि.30 – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या एका महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला आहे. महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये तिन्ही पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांना समाविष्ट केले जात आहे. धर्मनिरपक्षेतेच्या तत्तावर स्थापित झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या या मंत्रिमंडळात सर्वच समुदायाच्या नेत्यांना जागा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरीही काही नेत्यांमध्ये आपल्याला मंत्रिमंडळात स्थान नाही मिळाल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. तर काहींनी चक्क राजीनामा देण्याची तयारी सुद्धा दर्शवली आहे. नवीन मंत्रिमंडळात अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे.तर पहिल्यांदाच आमदार झालेले आदित्य ठाकरेंनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आल्याने शिवसेनेच्या काही नेत्यामध्ये नाराजीचा सुर दिसून आला.

या नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद

  • अशोक चव्हाण
  • दिलीप वळसे पाटील
  • धनंजय मुंडे
  • विजय वडेट्टीवार
  • अनिल देशमुख
  • हसन मुश्रीफ
  • वर्षा गायकवाड
  • राजेंद्र शिंगणे
  • नवाब मलिक
  • राजेश टोपे
  • सुनील केदार
  • संजय राठोड
  • गुलाबराव पाटील
  • अमित देशमुख
  • दादा भुसे
  • जितेंद्र आव्हाड
  • संदिपान भुमरे
  • बाळासाहेब पाटील
  • यशोमती ठाकूर
  • अनिल परब
  • उदय सामंत
  • के सी पाडवी
  • शंकरराव गडाख
  • असलम शेख
  • आदित्य ठाकरे

यांना राज्य मंत्रिपद

  • अब्दुल सत्तार
  • सतेज ऊर्फ बंटी पाटील
  • शंभुराजे देसाई
  • बच्चू कडू
  • विश्वजित कदम
  • दत्तात्रय भरणे
  • आदिती तटकरे
  • संजय बनसोडे
  • प्राजक्त तनपुरे
  • राजेंद्र पाटील यड्रावकर