27.7 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home विदर्भ सालेकस्यातील गुजरी बाजाराला स्थगिती

सालेकस्यातील गुजरी बाजाराला स्थगिती

0
33
सालेकसा,दि.02ः-सालेकसा नगरपंचायतीच्यावतीने  आज गुरुवार पासून दर गुरुवारी भरविण्यात येणार्या गुजरी बाजाराला स्थगिती देण्यात आल्याने पुढील सुचनेपर्यंत कुठल्याही प्रकारचे निर्णय न घेता सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष विरेंद्र ऊईके यांनी केले आहे.नगरपंचायतीने आठवडी बाजाराव्यतिरिक्त दर गुरुवारला गुजरी बाजार सुरु करण्यासाठी तहसिल कार्यालयाशेजारील जागा निर्धारित केली होती.परंतु सदर जागा ही वन विभाग आणि महसुल विभागाच्या अधीन असल्याने सदर जागेसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक असल्याने सदर ठिकाणी जिल्हाधिकारी यांची मंजुरी मिळेपर्यंत गुजरी बाजार भरवणे कायदेशीर नसल्याने गुजरी बाजाराला सध्या तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.  जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनंतरच पुढील गुजरी बाजार भरविण्यात येणार  असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना व नागरिकांना नगरपंचायत मार्फत कुठल्याही प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नये असे नगराध्यक्ष उईके यांनी म्हटले आहे.