27.7 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home विदर्भ लायन्स क्लब गोंदिया सिव्हीलच्यावतीने २७ डाॅक्टरांचा सत्कार

लायन्स क्लब गोंदिया सिव्हीलच्यावतीने २७ डाॅक्टरांचा सत्कार

0
5

गोंदिया,दि.०२ः-गोंदिया शहरातील प्रसिद्ध क्लब लायंस क्लब गोंदिया सिव्हीलच्यावतीने स्थानीय केटीएस हॉस्पिटलच्या कॉन्फ्रेंस हॉलमध्ये आयोजित डॉक्टर्स डे कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या २७ डाॅक्टरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायंस क्लब अध्यक्षा सौ भावना कदम या होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.कुसूमागर घोरपड़े,प्रा.डॉ पांवड़े, डॉ रुखमोडे, सहायक प्रा.डॉ मनु शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ मारसकोल्हे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तृप्ति कटरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ पोयम मैडम, प्रा.डॉ एल.बजाज,रीज़न चेयरपर्सन सुजाता बहेकार,झोन चेयरपर्सन पवन कटरे, सचिव केशव ठाकरे, कोषाध्यक्ष सौ मंजूषा फूंडे,हर्षद मेहता,डॉ खुशबू साकुरे, डॉ प्रशांत बागड़े,डॉ उपनगलवार, डॉ आरती आनंद, डॉ सोनाली खोबरागडे, डॉ लीना धाडे, डॉ कविता धाबर्डे , डॉ शुभांगी खामनकर, डॉ गरिमा अरोरा, डॉ संतोष बालगोटे, डॉ तृप्ति आंबिलकर, डॉ स्नेहा शर्मा, डॉ माधवी येटरे, डॉ शरद गुप्ता, डॉ दुवारे आणि सीए इरफान काजी,शेतकरी मित्र दीपक कदम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना डॉ घोरपड़े म्हणाले की,आम्ही आपली सेवा ही मनात सेवा ठेवूनच देत असतो आणि त्या सोबतच नवीन पिढीला वैद्यकीय प्रशिक्षण देऊन त्यांना घडविण्याचे अनमोल कार्य सुद्धा करीत आहोत.लायन्स क्लबने आमच्या या कार्याची दखल घेऊन आमचा सत्कार केला याकरीता आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो.यावेळी डॉ पांवड़े,डॉ रुखमोडे,डॉ बजाज,डॉ तृप्ति कटरे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.
शासकीय दवाखान्यात उच्चस्तरीय आरोग्य सेवा देऊन गरजवंत लाभार्थीची सेवा हीच खरी मानवसेवा असल्याचे विचार कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ भावना कदम यांनी व्यक्त केले.प्रोजेक्ट चेयरपर्सन गजेन्द्र फुंडे यांनी आभार मानले.आयोजनासाठी कोषाध्यक्ष सौ मंजूषा फूंडे, सचिव केशव ठाकरे, हर्षद मेहता, शरद क्षत्रिय, मोती अरोरा, सुरेश बहेकर, प्रशांत बोरकुटे, श्रीकांत बुद्धलवार, सुनील गढ़पाल्लीवर, शैलेन्द्र मिश्रा, कोमल कटारे , किशोर पटले, CA मोहम्मद इरफान काजी, गणेश बिसेन, सौ प्रज्ञा मेहता, सौ पूनम अरोरा, सौ चेतना कटरे, सौ उषा येटरे सहित मान्यवर सदस्यांनी सहकार्य केले.संचालन चार्टर प्रेसिडेंट दीपक कदम यांनी केले आणि आभार सचिव केशव ठाकरे यांनी मानले.