26.5 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसींचा विरोट मोर्चा ४ जानेवारीला

जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसींचा विरोट मोर्चा ४ जानेवारीला

0
39

भंडारा,दि.03ः– ओबीसींच्या जातीनिहाय जनगणेनेसाठी दि. ४ जानेवारी २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी ११ वाजता ओबीसींचा विराट मोर्चा ओबीसी जनगणना परिषद भंडाराचे वतीने आयोजीत करण्यात आला आहे. सदर मोर्चा दसरा मैदान शास्त्री नगर चौक भंडारा येथून निघणार असल्याची माहिती भंडारा येथील बावणे कुणबी समाज भवनातील संत तुकाराम महाराज सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषद देण्यात आली. सन १९३१ नंतर ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली नाही. ओबीसींची जनगणना झाली पाहीजे या मुख्य मागणीसाठी ओबीसी जनगणना परिषद भंडाराचे नेतृत्वाखाली जिल्हयातील सर्व ओबीसी संघटना संगठीत झाल्या आहेत.या मोर्च्याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा संपुर्ण पाठिंबा असल्याचेही महासंघाचे कार्याध्यक्ष डाॅ.खुशाल बोपचे यांनी कळविले आहे. आजही स्वतंत्र भारतातील ओबीसी गुलामीत जीवन जगत आहेत. ओबीसींची सातत्याने अधोगती होत आहे.

ओबीसींवर अन्याय होत आहे. ओबीसींचीआर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजीक प्रगती रोखण्याचे कार्य सुरू आहे. त्यामुळे आजपर्र्यंत ओबीसींची स्वतंत्र जनगणना झालेली नाही. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली पाहीजे ही मुख्य मागणी ओबीसींची आहे. तरी ओबीसींनो आपल्या स्वतंत्र अस्तित्वासाठी, जनगणनेसाठी आपले अमुल्य वेळ देवून आपले भविष्य अबाधित राखा, मोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन ओबीसी जनगणना परिषद जिल्हा भंडारा, ओबीसी अन्याय निवारण संघर्ष समिती जिल्हा भंडारा, ओबीसींमधील सर्वजातीनिहाय समाज संघटनांनी केले आहे.

स्वतंत्र जनगणनेमुळे असे मिळतील लाभ

सन २०२१ मध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली तर खालील लाभ होण्याचा अंदाज आंदोलक ओबीसींनी केला आहे. ओबीसींची जनसंख्या ६० ट्नके असल्याचे कायदेशिररित्या सिद्ध होईल. हायकोर्ट, सुप्रिम कोर्टात आपली बाजू समर्थपणे मांडून संख्येच्या प्रमाणात आरक्षण सुविधा मिळविता येतील. शिक्षण, प्रशिक्षण व नोकèयांमध्ये अधिकार प्राप्त होतील. लोकसंख्येच्या प्रमाणात राष्ट्रीय व राज्य अर्थसंकल्पाततरतूद करणे शासनाला भाग पडेल व ओबीसी युवकांना बेरोजगारीची प्रश्न मार्गी लागेल. ओबीसी वित्त महामंडळाची तरतूद वाढेल. अनूसुचित जाती/जमाती प्रमाणे लोकसभा व विधानसभेत ओबीसींना राखीव मतदार संघ मिळतील. ओबीसी विद्याथ्र्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह निर्मिती होईल. स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राची सुविधा उपलब्ध होईल.

बार्टी सारख्या स्वायत्त संस्थांमार्फत देश-विदेशात शिक्षणासाठी ओबीसी विद्याथ्र्यांना लाभ मिळेल. गरीब, शेतकरी, शेतमजूरांना ओबीसी संख्येच्या प्रमाणात घरकुलांचा लाभ मिळेल. शेतीसंसाधनासाठी सवलत मिळेल. शेतकरी आत्महत्येला आळा बसेल. विद्याथ्र्यांना मेडीकल, इंजिनिअरींग, आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकारी होतांना ५२ ट्नके जागा मिळतील. विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती व फी सवलत मिळेल. विराट मोर्चाचे वेळी मोठया संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत ओबीसी जनगणना परिषदेचे प्रमुख समन्वयक सदानंद इलमे, जिल्हा समन्वयक भगीरथ धोटे, पांडुरंग फुंडे, मुरलीधर भुर्रे, संजय आजबले, भैय्याजी लांबट, गोपाल सेलोकर, डॉ. बाळकृष्ण सार्वे, के. झेड. शेंडे, सुर्यकांत इलमे, उमेश मोहतुरे, सुभाष आजबले, उमेश सिंगनजुडे, आनंदराव उरकुडे, गोपाल ठवकर, जयंता झोडे, विश्वजीत पुंडे, अनंतलाल दमाहे, गोपाल देशमुख, मनोज बोरकर, शंकरराव उपासे, प्रभुजी मने, मोरेश्वर तिजारे तसेच ओबीसी समाजबांधवांनी केले आहे