26.5 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ वीज पडून बैलाचा मृत्यू

वीज पडून बैलाचा मृत्यू

0
142

चिचगड(देवरी)दि.03ः- देवरी तालुक्यातील धोबाटोला येथे २ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुखराम घसिया कुंजाम यांच्या घरामागील गोठ्या जनावरे बांधली होती. पहाटेच्या सुमारास गोठ्याजवळील झाडावर वीज कोसळली. यात गोठ्यातील एका बैलाचा जागीच मृत्यू झाला, तर एका वासराची नजर हरविली. यात कुंजाम यांचे अंदाजे ३0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.या घटनेची नोंद तलाठ्याने घेत पंचनामा केला असून त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.