29.6 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ गोंदिया पोलीस दलात मोठा फेरबदल

गोंदिया पोलीस दलात मोठा फेरबदल

0
0

गोंदिया, दि. १ जुलै : गोंदिया जिल्हा पोलिस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून १७ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी जारी केले आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ च्या कलम २२ (न) अन्वये जिल्हा आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार ही बदली प्रक्रिया पार पडली.गोंदिया ग्रामीणचे पोलिस निरीक्षक रेवचंद खुशाल सिंगनजुडे यांची प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) येथे नियुक्ती करण्यात आली आहे.रामनगरचे प्रविण बोरकुटे गोंदिया शहर,रावणवाडीचे वैभव पवार गोंदिया ग्रामीण,आमगावचे तिरुपती राणे रामनगर,दवनीवाड्याचा वैशाली ढाले गोरेगाव, डुग्गीपार पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश कृष्णा वनारे यांची देवरी पोलिस ठाण्याच्या ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे देवरी पोलिस ठाण्याच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.बदली झालेल्या सर्व अधिकान्यांनी तात्काळ नव्या ठिकाणी रुजू होऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांन्नी दिले आहेत.