37.7 C
Gondiā
Saturday, June 27, 2026
Home विदर्भ कालव्यात मंडप उभारून शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

कालव्यात मंडप उभारून शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

0
44

अर्जुनी मोरगाव,दि.05ः- रब्बी पिकासासाठी इटियाडोह प्रकल्पाचे पाणी पंपाव्दारे उचल करण्यास मनाई केल्याने अडचणीत आलेल्या शेतकNयांनी (दि.४) चक्क कालव्यावरच मंडप उभारून आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण आगळ्यावेगळ्या पध्दतीने होत असल्याने तालुक्याचे लक्ष वेधले आहे. शेतकNयांच्या भुमिकेपुढे सिंचन विभागाचे अधिकारी किती दिवस अट्टाहासाची भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे.
अर्जुनी मोरगाव हा मुख्यत: शेती व्यवसायाचा तालुका आहे. त्यातच अर्जुनी मोरगाव येथील इटियाडोह धरण सिंचनाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा असल्याने शेतकNयांना धरणापासून मोठी आस आहे. मात्र, सिंचन विभागाच्या अधिकाNयांच्या लालफितशाहीमुळे शेतकNयांना संकटाचा सामना करावा लागतो. हीच बाब रब्बी हंगामात पिकांची आशा ठेवलेल्या तालुक्यातील शेतकNयांना अधिकाNयांच्या अडेलटट्टू भुमिकेमुळे ओढावली आहे. इटियाडोह धरणाच्या पाण्यावर रब्बी पीक हंगाम अवलंबून असते. यावर्षी प्रकल्पामध्ये १०० टक्के जलसाठा असल्याने रब्बी पिकांना सिंचनासाठी पर्याप्त प्रमाणात पाणी मिळणार, अशी आशा बाळगून शेतकNयांनी कडधान्याची लागवड केली नाही. त्यातच भातपिक घेण्याचे नियोजन केले. परंतु, पाटबंधारे विभागाच्या अधिकाNयांनी पंपधारक शेतकNयांना रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार नाही म्हणजेच पाणी घेण्यास मनाई, अशी भूमिका घेतली. त्यामुळे संतापलेल्या शेतकNयांनी पाटबंधारे विभागाचे कार्यालय गाठून अधिकाNयांची मनधरणी केली. दरम्यान शेतकNयांना विभागीय अभियंता एफ.एस.सोनुने व उपविभागीय अभियंता भिवगडे यांच्या पुढे आक्रोश व्यक्त केला. मात्र, अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने (दि.४) शेतकNयांनी इटियाडोह धरणाच्या मुख्य कालव्यावर मंडप उभारून आमरण उपोषण सुरू केले आहे.