मुंबई,दि.05 – मंत्रिमंडळाच्या बहुप्रतिक्षित खातेवाटप जाहीर करण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या खात्यांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी या यादीला आज सकाळी मंजुरी दिली. ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली. यानंतर ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले.
खातेवाटपाची यादी पुढीलप्रमाणे…
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन,माहिती व जनसंपर्क,न्याय व विधी
- अजित पवार, उपमुख्यमंत्री, अर्थ आणि नियोजन
शिवसेना
- एकनाथ शिंदे : नगरविकास, सार्वजनिक बांधकाम
- सुभाष देसाई : उद्योग
- संजय राठोड : वने
- शंकरराव गडाख- जलसंधारण
- अनिल परब – परिवहन, संसदीय कामकाज
- उदय सामंत : उच्च तंत्रशिक्षण
- आदित्य ठाकरे : पर्यटन, पर्यावरण
- दादा भुसे : कृषी
- गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा
- संदिपान भुमरे : रोजगार हमी
- शंभुराजे देसाई : गृहराज्यमंत्री (ग्रामीण)
- अब्दुल सत्तार : महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री
- बच्चू कडू : जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार राज्यमंत्री
- राजेंद्र यड्रावकर – आरोग्य, सांस्कृतिक, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस
- अनिल देशमुख : गृहमंत्री
- छगन भुजबळ : अन्न नागरी पुरवठा
- दिलीप वळसे पाटील : राज्य उत्पादन शुल्क, कामगार
- धनंजय मुंडे : सामाजिक न्याय
- नवाब मलिक : अल्पसंख्याक
- बाळासाहेब पाटील : सहकार
- जितेंद्र आव्हाड : गृहनिर्माण
- राजेश टोपे : आरोग्य
- राजेंद्र शिंगणे : अन्न व औषध प्रशासन
- हसन मुश्रीफ : ग्रामविकास
- दत्ता भरणे : जलसंधारण, सामान्य प्रशासन राज्यमंत्री
- अदिती तटकरे : उद्योग, पर्यटन, क्रीडा राज्यमंत्री
- संजय बनसोड : पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री
- प्राजक्त तनपुरे : नगरविकास, ऊर्जा, उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री.
काँग्रेस
- बाळासाहेब थोरात : महसूल
- अशोक चव्हाण : सार्वजनिक बांधकाम
- नितीन राऊत : ऊर्जा
- वर्षा गायकवाड : शालेय शिक्षण
- के.सी. पाडवी : आदिवासी विकास
- अमित देशमुख : वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
- विजय वडेट्टीवार : मदत-पुनर्वसन, ओबीसी, खार जमीन
- यशोमती ठाकूर : महिला बालविकास
- अस्लम शेख : बंदर विकास, वस्त्रोद्योग आणि मत्स्य संवर्धन
- सुनिल केदार : दुग्धविकास आणि पशुसंवर्धन
- सतेज पाटील : गृह राज्यमंत्री (शहरे)
- विश्वजित कदम : कृषी, सहकार राज्यमंत्री





