गोंदिया,दि.06ः-जिल्हा पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात गत एक आठवड्यात जिल्हा पोलिसांनी एकूण १५ कारवायांमध्ये ५ लाख ९६ हजार ८८0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, १५ आरोपींवर संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्यात अवैध दारु विक्री, जुगार आदी अवैध व्यवसायाविरोधात जिल्हा पोलिस विभागाद्वारे पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. २१ डिसेंबर २0१९ ते ४ जानेवारी २0२0 दरम्यान जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातंर्गत राबविण्यात आलेल्या मोहिमेत अवैध व्यवसायिकांविरोधात एकूण १५ कारवाया करण्यात आल्या. यात तिरोडा पोलिस ठाण्यातंर्गत शास्त्री वॉर्डात सट्टापट्टी घेणारा आरोपी विरेंद्र होलीराम बडगे यांच्याजवळून ६ हजार १0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गोंदिया ग्रामीण पोलिसांनी कारंजा येथे आरोपी सट्टापट्टी घेणारा विश्वदीप राजेंद्र चौरे याच्याजवळून २ हजार ८२0 रुपये, दवनीवाडा पोलिसांनी रतनारा येथे अवैध दारू विक्री करताना आरोपी नेतलाल मारोतीसाव धुवारे याच्याजवळून ४ हजार ३४0 रुपयांचा मुद्देमाल, रावणवाडी पोलिसांनी दासगाव खुर्द येथे सट्टापट्टी घेणारा आरोपी नितेश भीमराव वासनिक याच्याकडून ९ हजार ७९0 रुपये, गोंदिया ग्रामीण पोलिसांनी जब्बारटोला शेतशिवारात अवैध दारुची वाहतूक करणार्या आरोपी सोहनलाल गोमन कुराहे यंच्याजवळून ३२ हजार १७0 रुपये, तिरोडा पोलिसांनी रामसागर वॉर्डात अवैध दारू विक्रेती आरोपी वर्षा आशीष कोटांगले हिच्याजवळून ५ हजार रुपयांची हातभट्टीची दारू, रामनगर पोलिसांनी कुडवा चौकात अवैध दारु विक्रेता विजय मोहन मेर्शाम याच्याजवळून ५ हजार ४00 रुपयांची देशी दारू, गंगाझरी पोलिसांनी गोदेखारी येथे अवैध दारु विक्रेता आरोपी रामप्रकाश लोकराम लांजेवार यांच्याजवळून ८ हजार रुपयांची हातभट्टीची दारू, सालेकसा पोलिसांनी सावंगी शिवारात अवैध रेती वाहतूक प्रकरणी आरोपी रामेश्वर सुखचरण दसरिया याचा ट्रॅक्टर, ट्रॉली व रेती असा ५ लाख ४ हजार रुपयांचा मुद्येमाल, केशोरी पोलिसांनी बोंडगाव सुरबन येथे अवैध दारू विक्रेता आरोपी रघुनाथ महागू शेंडे यांच्याजवळून १ हजार ४४0 रुपयांची देशी दारु व आरोपी देवानंद नकटू कोडापे याच्याजवळून २ हजार ४00 रुपयांची देशी दारू, रामनगर पोलिसांनी शक्ती चौकात सट्टापट्टी घेणारा आरोपी मनोज निळकंठ बिसेन यांच्याजवळून १ हजार ६६0 रुपये, तिरोडा पोलिसांनी डाकराम सुकडी येथो सट्टापट्टी घेणारा आरोपी सुरेंद्र अर्जुन बागडे याच्याजवळून २ हजार ८१0 रुपये, गंगाझरी पोलिसांनी कवलेवाडा येथे अवैध दार ५ विक्रेता आरोपी चैनलाल यशवंतराव तांडेकर यांच्याजवळून ८ हजार रुपयांची हातभट्टीची दारु व गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अदासी येथे वरली मटका घेणार्या आरोपी प्रल्हादसिंह सेवकरामसह पवार याच्याजवळून ३ हजार ४0 रुपये असा एकूण ५ लाख ९६ हजार ८८0 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले. या कारवाईतील आरोपींवर संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप अतुलकर, सहायक फौजदार कापगते, पोलिस हवालदार कृपाण, पोलीस नायक फुलबांधे, पोलीस शिपाई ठाकरे, हातझाडे, गौतम यांनी केली.





