सालेकसा,दि.06ः-तालुक्यातील जांभळी परिसरात शुक्रवारी (दि.३) रानडुकराची शिकार करणार्या दोघांना वन विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ किलो मांस जप्त करण्यात आले आहे.रानडुकराची पाच जणांनी शिकार केली असून त्यातील प्रकाश सुरजलाल कुसराम (४२) व हिरालाल गोमाजी कुंजाम (४0,रा.जांभळी) यांना अटक करण्यात आली आहे. वन विभागाच्या पथकाने त्यांच्या घरी धाड घालून अटक केली असून, घरातून रानडुकराचे ३ किलो मांस जप्त केले आहे. या प्रकरणातील आरोपी मुकेश चुन्नीलाल ढेकवार, राधेश्याम तन्नुलाल ढेकवार व भैय्यालाल सूद ढेकरवार (रा.जांभळी) हे अद्याप फरार आहेत. आरोपींजवळून मांसासह शिकारीसाठी वापरण्यात येत असलेले सेंट्रींग तार, कुर्हाडी व खुंट्य जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींना अमगावच्या न्यायालयात हजर करण्यात आले.





