28.9 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home शैक्षणिक कर्तृत्वान महिला सन्मान व पेन्शन जागृती कार्यक्रम उत्साहात

कर्तृत्वान महिला सन्मान व पेन्शन जागृती कार्यक्रम उत्साहात

0
39
देवरी,दि.05ः- महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटना देवरीच्या वतीने मॉ धुकेश्वरी मंदिरातील सभागृहात ‘सावित्रीबाई फुले जयंती’ निमित्ताने कर्तृत्वान महिलांचा सन्मान व पेन्शन मेळावा उत्साहात पार पडला.सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती सुनंदाताई बाहेकार होत्या.तर उदघाटक म्हणून जि.प.सदस्या उषाताई शहारे उपस्थित होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती  सोनबोइर,प.स.सदस्य सौ.ताराम,गटविकास अधिकारी मोडक,वितेश खांडेकर,राज कडव जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांच्या हस्ते १५ कर्तृत्वान महिलांचा शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.देवरी तालुक्यात नव्याने रुजू झालेल्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचा स्वागत करण्यात आला. तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून विलास लंजे यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट व पेन्शन मेळाव्याची वैशिष्ट्ये सांगितली.पेन्शन लढ्याविषयी चर्चासत्राला राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी मागील पाच वर्षात संघटनेने दिलेल्या लढ्याची माहिती दिली.आज सर्वच जुनी पेन्शनच्या बाबतीत सकारात्मक आहेत व पुढेही जुनी पेन्शन मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. तसेच इतर शिक्षक संघटना व कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी जुनी पेन्शन विषयीची आपली मते मांडली.संचालन मोहन बिसेन,संदीप मेश्राम,बाबा होनमाणे यांनी केले.यशस्वितेकरिता तालुकाध्यक्ष सहित सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.