सडक अर्जुनी,दि.06ःः महाराष्ट्र पत्रकार संघ व मराठी पत्रकार संघ तालुका सडक अर्जुनीच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून पत्रकार दिनानिमित्त सडक अर्जुनी तालुका मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनीश्वर यांच्या मार्गदर्शनात येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांनी सुरुवातीला सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत वेगवेगळ्या पद्धतीने रुग्णालयातील रुग्णांना व कर्मचाऱ्यांना मदत होईल असे कार्य करीत रहावे असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल मुनिश्वर, सचिव सुखदेव कोरे, राजेश मुनिश्वर, अशोक ईडपाते, सुशील लाडे, मुन्नासिंग ठाकूर,बबलू मारवाडे, असलेस माडे, सुधीर शिवणकर, राधेश्याम कवरे, उमराव मांढरे, अरविंद बिसेन, जितेंद्र चन्ने,निखिल मुनिश्वर, अरविंद मेंढे,आऱ.व्ही.मेश्राम,ओमप्रकाश टेंभुर्णे,निशांत राऊत,बिर्ला गणवीर आदी पत्रकार तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम, बजरंग दलाचे मुन्ना पुरी, नेपाल भोंडे, सतीश राजगिरे, राहुल वरवाडे, गोलू नान्हे, राहुल गहाणे प्रवीण गहाणे दर्शन राजगिरे व रुग्णालयातील कर्मचारी तसेच बाहेर गावावरून आलेले रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते.




