नागपूर,दि.06ः- येत्या एप्रिल महिन्यापासून सुरु होत असलेल्या राष्ट्रिय जनगणना कार्यक्रमात ओबीसींची स्वतंत्र जातगणना करण्यात यावे यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करीत आहे.त्यातच 2021 मध्ये ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात येईल असे आश्वासन तत्कालीन गृहमंत्री व विद्यामान सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले होते.सत्तेत येण्यासाठी ओबीसींचा उपयोग केला परंतु आज मात्र जनगणनेचे जे पत्रक तयार करण्यात आले,त्यात ओबीसींचा कुठेच उल्लेख नसल्याने केंद्रातील भाजप सरकार आपल्या आश्वासनाला विसरल्याने आठवण करुन देण्यासाठी आज देशपातळीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जनगणना करण्याच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांना राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डाॅ.बबनराव तायवाडे व कार्याध्यक्ष माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले. निवेदन देणार्या शिष्टमंडळात शरद वानखेडे,शहराध्यक्ष संजय पन्नासे,गणेश नाखले,चंद्रकांत हिंगे,सुषमा भड, रेखाताई बारहाते,कल्पना मानकर,नंदाताई,देशमुख,अरूण पाटमासे,रवि,वर्हाडे,शकील पटेल ,रोशन कुंभलकर,अर्चना बरडे,राजाभाऊ चिलाटे,हरीभाऊ बांते,त्रिशरण सहारे,राजेश रहाटे,विनोद उलिपवार,समिक्षा गणेशे,रत्नाभांडे,सई भांडे,भाग्यश्री बारहाते,टेमराज जिचकार,टि.एन.ढोबे,गुलाबराव सोनवने,रोहित फुंड,कोमल लांडे ,वैष्णवी घरडे,अंकिता देशमुख,प्रियंका चोपडे आदी उपस्थित होते.राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने संपूर्ण देशात ओबीसी जनगणनेसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.सोबतच ओबीसी समाजाचे मोर्चे,धरणे आंदोलन,जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचाही उल्लेख आहे.जिल्हाधिकाऱी रविंद्र ठाकरे यांनी मागण्यांचे निवेदन केंद्राकडे तत्काळ पाठविण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.




