गोंदिया,दि.07ः-रायपूर येथील रुची अँग्रो फार्मवर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळा ५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढविण्याची मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लावून धरली.
प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अमर वराडे यांच्या नेतृत्वात आयोजित संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी जिप अध्यक्ष टोलसिंग पवार होते. यावेळी आ. सहेसराम कोरोटे, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, माजीमंत्री भरत बहेकार, माजी जिप अध्यक्ष अँड. के.आर.शेंडे, माजी नगराध्यक्ष के. बी. चव्हाण, प्रदेश सचिव डॉ. योगेंद्र भगत, डॉ. एन.डी.किरसान, डॉ. झामसिंग बघेले, भालचंद्र ठाकूर, महेंद्र ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते. संमेलनात पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली. तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पक्षाने स्वबळावर लढाव्यात, अशी मागणी उपस्थित सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लावून धरली. दरम्यान उपस्थित पदाधिकार्यांनी कार्यकत्यार्ंनी मार्गदर्शन केले. संमेलनात जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अमर वराडे यांनी केले. संचालन डॉ. संजय देशमुख यांनी केले तर आभार राजेश नंदागवळी यांनी मानले.





