40.3 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ घरकुल बांधकाम अर्धवट झाल्याने उघड्यावर संसार

घरकुल बांधकाम अर्धवट झाल्याने उघड्यावर संसार

0
384

गोरेगाव,दि .8:येथील नगर पंचायत अंतर्गत २ लाख ५0 हजार रुपये किमतीच्या पंतप्रधान घरकूल (नगर) योजनेचा लाभ देण्यासाठी गरजू लाभार्थ्यांकडून अजार्ची मागणी करण्यात आली. परंतु, प्रती लाभार्थी १ लाख ५0 हजार रूपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून लाभार्थ्यांना देण्यात आले नसल्याने अर्धवट बांधकाम पडून आहेत. हा प्रकार वर्षभरापासून सुरू असून लाभार्थ्यांना उघड्यावर संसार थाटावा लागत आहे.
पहिल्या टप्प्यात ३६७ गरजू लाभार्थी व दुसर्‍या टप्प्यात १९0 लाभार्थी अशा ५५७ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २३६ घरकूल बांधकामाची परवानगी लाभार्थ्यांना देण्यात आली. या लाभार्थ्यांनी शासनाच्या अटी व शर्तीनुसार दस्तऐवज सादर केल्याने पहिला हप्ता म्हणून प्रती लाभार्थी ४0 हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले. बांधकामासाठी अनेक लाभार्थ्यांनी जुने मातीचे घर तोडून तर काहींनी उपलब्ध भुखंडात घरकूल बांधकामास सुरुवात केली. यात २३६ लाभाथ्यार्पैकी १५१ लाभार्थ्यांनी पाया उभारून भिंती तयार केल्याने त्यांना दुसरा हप्ता देण्यात आला. सज्जापर्यंत बांधकाम करणार्‍या १0८ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता १ लाखांपर्यत राज्य शासनाने अनुदान देण्यात आले. मात्र, प्रती लाभार्थी केंद्र सरकारचा १ लाख ५0 हजारांचा अनुदान वाटा लाभार्थ्यांना देण्यात आला नाही. अटी व शर्तीनुसार काम करणार्‍या फक्त १0८ लाभार्थ्यांना एका लाखपर्यतचे अनुदान मिळाले आहे. उर्वरित लाभाथ्यार्ना अनुदानाची प्रतीक्षा करावी लागत आहे.