36.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home गुन्हेवार्ता आमादर कोरेटेंच्या वाहनाच्या धडकेत इसम जखमी

आमादर कोरेटेंच्या वाहनाच्या धडकेत इसम जखमी

0
47

आमगाव,दि.13ःआमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सहसराम कोरेटे हे आमगाव येथील तहसिल कार्यालयातून आढावा बैठक आटोपून देवरीकडे परत जात असताना तालुक्यातील अंजोरा येथे नवनिर्मित सिमेंटरस्त्यावर आ.कोरेटेंच्या वाहनानेऩ (MH 35 AP 8899) 45 वर्षीय इसमाला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.या घटनेनंतर आमदार कोरेटी यांनी जखमी इसम सुनिल तुमसरे(वय 45) यास आपल्याच वाहनातून आमगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले.ही घटना सायकांळी 6.45 वाजेच्या सुमारास घडली.जखमीवर ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे उपचार सुरु आहेत.