गोंदिया,दि.15ः- भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे वैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 15) दुपारी 12च्या सुमारास घडली; तर गोंदिया जिल्ह्यातील बिरसोला संगमघाट येथील वैनगंगा नदीत बुडत असणाऱ्या तीन युवकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या शोध व बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढल्याची घटना समोर आली आहे.विशेष म्हणजे गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्यावतीने दोनतीन दिवसापासून सोशल मिडीयावर मकरसंक्रातीनिमित्त नदीघाटावर जाणार्यांना सावधनातेचा इशारा दिला जात असताना आणि घटनास्थळावरही स्पिकरच्यामाध्यमातून सुचना सुरु असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत नदीपात्रात पोहण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त बिरसोला संगमघाट येथील घाटावर गेलेल्या तीन युवकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या शोध व बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. ही घटना आज बुधवारी (दि. 15) दुपारी 3 च्या सुमारास घडली.बिरसोला संगमघाट येथील वैनगंगा नदी काठावर मकरसंक्रांतीनिमित्त यात्रा भरली होती. या यात्रेला कार्तिक रहांगडाले (वय 22, रा. बघोली), कपिल देवधारी (वय 21, रा. बाजारटोला) व विशाल बैरवाल (वय 20, रा. भद्याटोला) हे आले होते.तिघांनाही पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्यामुळे ते नदीत उतरले. क्षणातच पाण्यात गटांगळ्या खावू लागल्याने तिथे उपस्थित शोध व बचाव पथकाच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी लगेच नदीत उडी घेऊन तीनही जणांना सुखरूप बाहेर काढले. 14 जानेवारीपासून 7 सदस्य चमू बिरसोला संगमघाट येथे तैनात आहे.जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे व पोलीस अधिक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी रावणवाडी पोलीस ठाण्याचे उप निरिक्षक सचिन वांगडे यांच्यासोबत नजर ठेवून होते. पोलीस हवालदार खोब्रागडे, पोलीस नायक उईके, पोलीस नायक बोपचे, पोलीस कॉन्स्टेबल रहांगडाले, पोलीस कॉन्स्टेबल कराडे, पोलीस कॉन्स्टेबल भांडारकर, नायक पोलीस शिपाई जावेद पठाण यांनी या तिन्ही युवकांना नदीपात्रातून सुखरूप बाहेर काढले.
तर पवनी येथील वैनगंगा नदीघाटावर नदीत गेलेला चेंडू आणायला गेलेला चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील पाहरणीचा सागर विलम घाटावर आलेदुपारी नदी पात्रातील वाळूवर खेळत असताना चेंडू नदीत गेला. तो काढण्यासाठी सागर नदीच्या आत गेला असता, पाण्याचा अंदाज चुकल्याने तो बुडालायावेळी उपस्थितांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा बुडून मृत्यू झाला. दुपारी एक वाजेनंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. सागर हा इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता. याप्रकरणी पवनी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे





