33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home गुन्हेवार्ता शिक्षण सभापती अंबुुले चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात

शिक्षण सभापती अंबुुले चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात

0
24

गोंदिया,दि.24ः-गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले यांना आज(दि.24)दुपारच्या सुमारास ते आपल्या कार्यालयात कार्यालयीन काम करीत असतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखानी चौकशीसाठी आपल्यासोबत नेल्याने खळबळ माजली. तक्रारदार हे ठेकेदारीचे काम करीत असुन सन २०१८ – १९ या आर्थिक वर्षात माहे मार्च २०१९ मध्ये शिक्षण व जिल्हानिधी शिक्षण योजने अंतर्गत जिल्हा परिषद गोंदिया कडुून विद्युतीकरणाचे २१ कामे प्राप्त झाली होती. विद्युतीकरणाचे कामाचे संपुर्ण अधिकार त्याना होते.तकारदार यांना विद्युतीकरणाचे कामांपैकी काही कामांचे देयक त्यांना प्राप्त झाल्यानंतर  रमेश अंबुले सभापती, शिक्षण व आरोग्य, जि.प. गोंदिया यांनी तकारदाराकडे असलेल्या विद्युतीकरणाचे कामाचे जवळपास रू. २० .००,०००/- निविदा रकमेची देयके काढुन देण्याकरीता २० टक्क्याप्रमाणे रू. ४,००,०००/- लाच रक्कमेची मागणी केली.परंतु तक्रारदाराला ते द्यायचे नसल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवली त्यानुसार  लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदियाने 21  अंबुले यांची तक्ारदाराकडे असलेल्या लाच रकमेच्या पडताळणी कार्यवाही दरम्यान गै.अ. ठेवलेली कामाचे देयके काढण्यास सांगण्याकरीता मागील प्राप्त झालेल्या देयकांची व उर्वरीत विद्युतीकरणाचे कामांचे देयके काढुन देण्याकरीता तकारदाराकडे विद्युतीकरणाचे कामाचे जवळपास रू. २०,००,०००/- निविदा रक्कमेच्या २० टक्क्याप्रमाणे रू. ४,००,०००/- लाच रक्कमेची मागणी करुन तडजोडीअंती १५ टक्क्याप्रमाणे रू. ३,००,००0/-लाच रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केल्याने  रमेश  अंबुले यांच्याविरुध्द पो.स्टे, गंगाझरी, जि. गोंदिया येथे कलम ७ ला प्र. कायदा १९८८ ( सुधारीत अधिनियम २०१८ ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे तक्रारदार हा माजी आमदार यांच्याजवळचा व्यक्ती असल्याचे बोलले जात असून अंबुले सुद्दा हे माजी आमदार समर्थकच होते.त्यानंतरही झालेल्या प्रकारामुळे राजकारणात खळबळ माजली असून अंबुले यांना जिल्हापरिषदेतील काही विद्यामान पदाधिकायानी  राजकारणातून फसवल्याचेही बोलले जात आहे.