गोरेगाव,दि.03: मानूस हा लहानपणापासून सर्व गुण अंगिकृत करतो तो फक्त प्राथमिक शिक्षणापासून. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून कला, सांस्कृतीक, बौद्धीक विकास हा प्रथम चरणामध्ये विद्याथ्र्यांच्या जिवनामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून घडू शकतो. विद्यार्थी जिवनाचा शिक्षण हा आजच्या घडीला कना आहे. सर्व गुण अंगिकृत करताना गुरुची भूमीका पण महत्वाची असते. म्हणून विद्याथ्र्यांनी आपआपली क्षमता दाखविण्याची गरज आहे. त्यातूनच त्यांना सामोरे जाण्याची दिशा मिळणार आजचा विद्यार्थी हा समोरचा समाजाचा एक नवीन दिशा देणारा प्राणी आहे असे उद्बोधन राका युवक नेता रविकांत बोपचे यांनी जिल्हा परिषद शाळा सोनी येथे सांसकृतीक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सभापती पी.जी.कटरे होते.तर रंगपूजक म्हणून जिल्हा बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डोमाजी बोपचे, सरपंच उषा वलथरे, उपसरपंच अशोक पटले, झनक चव्हाण, आशा बोपचे, व्ही.टी. पटले, काशीराम पटले, भावलाल गौतम, दिलीप बोपचे, मालीकराम टेंभरे, माजी सरपंच देवराम पटले, गावकरी मंडळी उपस्थित होते.





