अर्जूनीमोर,दि.03 – आगामी एप्रिल महिन्यापासून राष्ट्रीय जनगणनेला सुरवात होत आहे. जनगणनेच्या प्रारुपामध्ये ओबीसींसाठी कोणताही रकाना नाही. त्यामुळे ओबीसींची गणना केली जाणार नाही, हे स्पष्ट आहे. यावरून केंद्रीय मंत्री रामनाथ सिंह यांनी ओबीसींची गणना करण्याविषयी दिलेले आश्वासन पार हवेत विरले. जनगणना प्रारुपात ओबीसींचा रकाना असेल तरच सहकार्य अन्यथा ओबीसींचा या जनगणनेवर बहिस्कार, या विषयी गावागावात पोस्टर चिपकाओ आणि जागृती अभियान तालुक्यात धडाक्यात राबविले जात आहे.
अर्जूनी मोरगाव तालुक्यात येत्या ५ फेब्रुवारीला ओबीसी जागृती अभियानाची सुरवात सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. यावेळी स्थानिक तहसील कार्यालयात एका सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेला राष्ट्रीय नेते, मंत्री, खासदार, आमदारांसह सर्वच लोकप्रतिनिधी यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. यानंतर ही यात्रा ताडगाव,झरपडा, धाबेटेकडी, वडेगाव, ईटखेडा, इसापूर,खामखुर्रा, महागाव, सिरोली, केशोरी, बोंडगाव, सुरबन, गोठणगाव, कोहलगाव आणि रात्रीला नवेगाव बांध येथे मुक्काम अशी निघणार आहे.
६ फेब्रुवारीला देवलगाव, कुंभीटोला, बाराभाटी, पिंपळगाव, अरततोंडी, निमगाव, बोंडगावदेवी, खांबी, चान्नाबाक्टी, बोरगाव,सावरटोला नवेगाव पांढरवाणी, परसोडी येथून कोहमाराकडे प्रस्थान करणार आहे.
वाघ, शेळी, कुत्रे, मांजर जनावरे यांची गणना सरकारला मान्य आहे. परंतु. सन १९३१ नंतर नागरिकांचा मागास प्रवर्गातील ओबीसी, एनटी, व्हीजे, एसबीसी सह अन्य प्रवर्गाची गणना शासनाला मान्य नाही. ओबीसींचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तर उंचावण्यासाठी ओबीसींची गणना होणे अत्यावश्यक आहे. परिणामी, आगामी राष्ट्रीय जनगणना पत्रकामध्ये ओबीसींचा रकाना असेल तरच जनगणनेला सहकार्य अन्यथा ओबीसींचा जनगणनेवर बहिस्कार राहणार आहे. यासाठी गावागावात जागृती अभियान मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
गोंदिया:-१ फेबु्रवारी रोजी शिक्षक पतसंस्थेत आयोजित बैठकीत गोंदिया तालुक्यात ओबीसी जनगणना रथयात्रेचे प्रचार व प्रसार करण्यासाठी बैघकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिलाध्यक्ष बबलू कटरे, कार्याध्यक्ष अमर वèहाडे, गोंदिया तालुका प्रभारी राजीव ठकरेले, समन्वयक विनोद हरिणखेडे, रामू चुटे, डॉ. सुरेश कावळे, कैलाश भेलावे, सुनील पटले, तीर्थराज उके, मनोज मेंढे, सुनील भोंगाडे, तिर्थराज हरिणखेडे, रवी भांडारकर, नितीन टेंभरे, मोहनलाल पटले, दुलीचंद भाकरे, किर्ती राने, मो.युनूस शेख, राजेश नागरीकर, गणेश बरडे, कमल हटवार, संजीव रहांगडाले, भुवन रिनायत आदि उपस्थित होते.
तिरोडा: येथे २ फेबु्रवारी रोजी वेदांत आयटीआय येथे जनजागरण यात्रे संदर्भात झालेल्या बैठकीत तिरोडा तालुक्यात प्रचार-प्रसार करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिलाध्यक्ष बबलू कटरे, मार्गदर्शक खेमेंद्र कटरे, तिरोडा तालुका समन्यव वाय.टी.कटरे, डॉ. संजीव रहांगडाले, महेंद्र बिसेन, ओबीसी अधिकारी-कर्मचारी संघटनेचे ए.डी. शरणागत, डी.एच.चौधरी, रवि मुरकुटे, डी.एल. गिरीपुंजे, तारेंद्र रहांगडाले, एम.आर. पारधी, यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. दरम्यान जनजागरण यात्रे संदर्भात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, तुमसरचे माजी आमदार चरण वाघमारे यांची भेट घेवून त्यांना यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले.




