40.3 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home राजकीय उत्तर नागपूरातील युवकांचा मनसेत प्रवेश

उत्तर नागपूरातील युवकांचा मनसेत प्रवेश

0
34

नागपूर,दि.04ःउत्तर नागपुरातील प्रभाग क्र.2 या भागातील अनेक युवकांनी राज ठाकरेंच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत आज मनसेत प्रवेश केला.मनसेच्या कार्यालयात झालेल्या प्रवेश कार्यक्रमात प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी युवकांच्या हाती मनसेचा ध्वज देत स्वागत केले. यावेळी शहर अध्यक्ष अजय ढोके, शहरसचिव घनश्याम निखाडे, उत्तर विभाग अध्यक्ष उमेश बोरकर, विभाग सचिव महेश माने ,मंगेश निखाडे  प्रामुख्याने उपस्थित होते.नारी भागातील समस्यांना हात घालून त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा व राजसाहेबांचा विचार घरोघरी पोहचवून 2022 मध्ये होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीत आपला हक्काचा प्रतिनिधी निवडून पाठवा असे आवाहन हेमंत गडकरी यांनी मनसेत प्रवेशकर्त्याना केले. उत्तर नागपुरातील मनसेच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मागदर्शनाखाली जनतेच्या कामासाठी त्या भागातील नगर मनपा झोन कार्यालय दणाणून सोडा असे शहर अध्यक्ष अजय ढोके यांनी सांगितले. घनश्याम निखाडे,उमेश बोरकर, यांनी सर्वांचे स्वागत केले.तर महेश माने यांनी आभार मानले. मनसेच्या मजबुतीसाठी नारी भागात मेहनत करू असे मनोगत शुभम उमाठे, प्रशिक बैसारे, अमरनाथ उईके,चंदू ब्राम्हणे,योगेश निखाडे, आकाश सोनेकर, या प्रवेश घेणाऱ्या युवकांनी  व्यक्त केले,