संतोष रोकडे/अर्जुनी-मोर,दि.07ःः वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडलेली घटना व औरंगाबाद घटनेतील दोषींवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन अर्जुनी-मोर तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने तहसीलदारामार्फेत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
निवेदनात 3 फेब्रुवारी 2020 ला वर्धा जिल्ह्यातील हिंगणगाव येथे तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार तसेच औरंगाबाद येथे घरात घुसून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून अद्यापही दोषींवर कार्यवाही करण्यात आलेली नाही.तरीही सदरील दोन्ही घटनांचा भारतीय जनता पार्टी अर्जुनी-मोरच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात येत असून या दोन्ही प्रकरणातील दोषी असलेल्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदन देतेवेळी अर्जुनी-मोर तालुका भाजपा अध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर,जि.प.सदस्य रचना गहाणे,महिला मोर्चा अध्यक्ष मंजुषा तरोने,उमाकांत ढेंगे प्रकाश गव्हाणे,नगरसेवक गीता ब्राह्मणकर,जि.प.सदस्य तेजूकला गहाणे,जि.प.सदस्य मंदाताई कुंभरे,जि.प. सदस्य कमलताई पाऊलझगडे, गिरीश बागडे, रघुनाथ लांजेवार व कार्यकर्ते उपस्थित होते





