38 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ गराडा येथे शनिवारला सत्यपाल महाराजांचे समाजप्रबोधनपर कीर्तन

गराडा येथे शनिवारला सत्यपाल महाराजांचे समाजप्रबोधनपर कीर्तन

0
49

तिरोडा,दि.08:- तालुक्यातील गराडा येथे श्री साईबाबा पालखी, छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्ताने सत्यपाल महाराज यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन सायं.७:३० वाजता आयोजित करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनील मेंढे राहणार आहेत.तर उद्घाटक म्हणून आमदार विजय रहांगडाले,डॉ.परीणय फुके, माजी मंत्री चन्द्रशेखरजी बावनकुळे यांच्यासह तिरोडा न.प.उपाध्यक्ष सुनील पालांदुरकर, कृ.ऊ.बा.स.सभापती डॉ.चिंतामण रहांगडाले,माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले,माजी बाजार समिती सभापती वाय.टी.कटरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.