33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करावी-प्रभाकर तिवारी

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करावी-प्रभाकर तिवारी

0
39

गडचिरोली,दि.7:- गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणारे लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन प्रभाकर तिवारी कमाडंट केंद्रीय राखीव दल यांनी केले. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पुणे येथील प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोद्वारा गडचरोली येथे आयोजित सांस्कृतिक कलाकारांसाठी आयोजित “केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना” या कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्रभाकर तिवारी बोलत होते. याप्रसंगी सीआरपीएफचे कमांडंट जीयाउ सिंग, प्रादेशिक लोकसंपर्क संचालक संतोष अजमेरा, सेंकड इन कमांडंट टी.के. सोलंकी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अमित पुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. सोलंकी पुढे बोलतांना म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व घटकातील लोकांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी त्यांच्या पर्यत त्यांच्याच भाषेत माहिती पोहचविणे गरजेचे आहे. तेव्हाच त्यांचा विकास साधता येईल असे  मत त्यांनी व्यक्त केले.

प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरोचे संचालक संतोष अजमेरा यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात तळागाळातील लोकांचा विकास साधण्यासाठी लोक कलावंतांनी त्यांचा विश्वास संपादन करुन आपल्या उद्बोधन व प्रबोधन कार्यक्रमाद्वारे पोडतिडकीने विविध कल्याणकारी योजनांची माहिती पोहचिण्याचे काम करावे असे आवाहन केले.जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ  यांनी गडचिरोली जिल्ह्यात सात स्थानिक भाषा बोलल्या जातात त्यांच्या पर्यंत योजनांची माहिती पोहचविण्यासाठी कार्यक्रमांचे सादरीकरण करतांना त्यांना समजेल त्याच भाषेतून योजनांचा प्रचार प्रसार केला पाहिजे तसेच आरोग्य आणि कुपोषणाच्या संदर्भात लोकामध्ये माहिती देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान सांस्कृतिक कलाकारांना  विविध योजनांची माहिती देण्यासाठी विविध सत्रामध्ये मान्यवरांनी विविध योजनांची माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्राचे निवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक शांतीलाल सेठा यांनी बँकाच्या विविध योजनांची माहिती देतांना प्रत्येक कुटुंबात एकतरी बँक खाते असणे गरजेचे असण्याचे सांगितले. संदेश या संस्थेचे संचालक गुरुदास सेमस्कर यांनी मानवाच्या इतंभूत विकाससाठी  योजना राबवित असतांना निसर्ग, जलसंवर्धन, वन्यजीव संवर्धन करुन गावात शासनाच्या विविध योजना राबवित असतांना व्यवस्थापनाची माहिती त्यांनी दिली. नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यांनी युवकांसाठी योजनांची माहिती दिली.

गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यातील विविध  गावांमध्ये जाऊन केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती देण्यासाठी जवळपास शंभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी सांस्कृतिक कलाकारांचे सात संच आपल्या मनोरंजन कार्यक्रमातून माहिती देणार आहेत. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरोचे व्यवस्थापक किरण भुजबळ व पंकज दाभाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन क्षेत्रिय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केले.