33.9 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home Featured News गोंदिया जिल्ह्याच्या सार्वजनिक शौचालय बांधकामाची केंद्राकडून दखल

गोंदिया जिल्ह्याच्या सार्वजनिक शौचालय बांधकामाची केंद्राकडून दखल

0
50

* कचारगड येथे केले आहे बांधकाम

गोंदिया,दि.09 – जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने कचारगड येथे तयार करण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय बांधकामाची केंद्र शासनाने दखल घेतली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जिल्ह्यातील कचारगड येथे 8 फेब्रुवारी 2020 पासून यात्रेला सुरुवात झाली आहे. याठिकाणी यात्राकाळात दर दिवशी हजारो भाविक भेटी देतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता श्री राठोड यांच्या पुढाकाराने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात पाणी स्त्रोतांचे शुद्धीकरण, प्लास्टिक मुक्ती अभियान, कचरा संकलन यासह भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक शौचालये बांधकाम करण्यात आली असून त्यांची उत्कृष्ट रंग रंगोटी करण्यात आली आहे. सदर बांधकामाची दखल जलशक्ति मंत्रालयाचे केंद्रीय पेयजल, पाणी व स्वच्छता विभागाचे सचिव परम अय्यर यांनी घेतली. त्यांनी कचारगड येथील सार्वजनिक शौचालय बांधकामा संदर्भात, community toilets in Gondia, Maharashtra असे लिहून ट्वीट केले आहे. सदर शौचालय बांधकाम उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता तज्ञ रहमतकर, अभियांत्रिकी तज्ञ पटले यांनी केले आहे.