यवतमाळ,दि.08ः विडूळ येथील वचन अकादमी महाराष्ट्र बसव परिषद भालकी शिक्षण दृष्टी केंद्र विडुळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक उमामहेश्वर संस्थान मध्ये होत असलेल्या राज्यस्तरीय बसव साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज मोठ्या थाटात संपन्न झाले.कार्यक्रमाच्या प्रारंभी गावातील मुख्य रस्त्यावरून महात्मा बसवेश्वर यांची वेशभूषा धारण करून घोड्यावर अश्वारुढ होऊन शरण, शरनांनी वचन साहित्याची ग्रंथ दिंडी काढण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुष भजनी मंडळ तसेच ज्येष्ठ नागरिकांसह युवकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्र बसव परिषद भालकी कर्नाटक येथील डॉ बसवलिंग पट्ट देवरू स्वामी यांचे दिव्य सान्निध्य लाभले कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपद यवतमाळ येथील डॉ अशोक मेनकुदळे यांनी भूषविले. तर संमेलनाध्यक्षपदी लातूर येथील ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ नागोराव कुंभार होते. कार्यक्रमात पुणे येथील रमेश आप्पा कोरे, नांदेड येथील अॅड अविनाश भोसीकर उमरखेड न प शिक्षण सभापती प्रकाश अप्पा दूधेवार ,अमोल तुपेकर ,सरपंच विनोद रणमले ,डॉ.शिवचरण हिंगमिरे,पोलीस पाटील गजानन मुलांगे आधी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. बसवलिंग पट्टदेवरू स्वामी यांनी वचन साहित्य वर भाषण करताना वचन साहित्याची देवाण-घेवाण करण्याकरिता लग्न समारंभ ,वाढदिवस व संक्रांतीच्या वानाचा कार्यक्रम यामध्ये महागड्या वस्तू कपडे न देता महात्मा बसवेश्वरांनी लिहिलेल्या वचन साहित्याचा वापर करावा जेणे करून महात्मा बसवेश्वरांचे विचार जनमाणसात पसरतील असे विचार व्यक्त केले. तसेच संमेलनाध्यक्ष डॉ कुंभार यांनी साहित्यिकाची भूमिका सांगताना साहित्यिकाने सत्याच्या बाजूनेच आपली भूमिका मांडावी याबद्दल प्रखरपणे आपले विचार व्यक्त केले. तर स्वागत अध्यक्ष डॉ मेनकुदळे यांनी नविन पिढ्यांना बसव साहित्याचे आकर्षण का असावे याबाबत आपले विचार व्यक्त केले. या साहित्य संमेल्लनाला यवतमाळ येथुन डॉ.जयेश हातगांवकर, निलेश शेटे,नागेश कुल्ली मंगेश शेटे,सौ.कल्पना देशमुख,अॅड पकंज शेटे,राजेन्द्र मेनकुदळे,नांदेड येथुन प्रा.आनंद कर्णे,कोल्हापुर येथुन बाळासाहेब पाटील,लातुर येथुन डॉ.भिमराव पाटील तसेच राज्यभरातील मान्यवर उपस्थीत होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर सचितानंद बीचेवार यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन मुलंगे तर आभार राहुल गाजेवार यांनी व्यक्त केले यांनी मांनले





