गोटूल संस्था व उडान मित्र परिवाराचा नाविन्यपूर्ण उपक्रम*
सालेकसा,दि.11ः-तालुक्यातील नेहमी विविध सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गोटुल आदिवासी बहुउद्देशीय संस्थेची कार्य नेहमी गौरवान्वित करणे योग्यच असून समाज उपयोगी कार्यात पुढाकार असतो. कामातील नावीन्यत्वात सातत्य ठेवून गोटुल संस्थेच्या सहकार्याने तसेच उडान मित्रपरिवार यांच्या पुढाकाराने मोहाटोला गावातील युवकांनी मोहाटोला जि. प. प्राथमीक शाळेच्या परिसरात विविध प्रजातीच्या 100 झाडांची लागवड करण्याचे ध्येय मनाशी बाळगून या वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.
वन विभाग तसेच सामाजिक वनीकरण यांना युवकांनी घेतलेल्या या निर्णयाचा हेवा वाटावा अशी कामगिरी युवकांनी हाती घेतली आहे. झाडे नुसते लावणारच नाही तर त्यांना जगवूनही दाखवू असा संकल्प यावेळी मोहाटोला गावातील युवकांनी घेतला. 100 वृक्ष लागवड संकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी गोटुल संस्थेच्या अध्यक्ष वंदना मेश्राम, राहुल हटवार, पवन पाथोडे, ध्रुवकुमार हुकरे, अमित वैद्य, रोहित बनोठे, दालचंद मोहारे, भुमेश्वर ठाकरे, गीताबाई चौधरी, लोवंती बनोठे, विमलाताई बनोठे, सवंतीबाई मोहरे, चेतनभाऊ मेश्राम, तेजराम मेश्राम, डानेरा मोहारे, अमित पगरवार, राजेश सुलाखे, शिवप्रकाश बनोठे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आले. उपस्थितांनी वृक्षलागवडीचा नाविन्यपूर्ण निर्णय घेणाऱ्या गोटुल आदिवासी बहुउद्देशीय संस्था सालेकसा तसेच उडान मित्रपरिवार आणि मोहाटोला गावातील युवकांचे अभिनंदन व कौतुक केले.





