नागपूर,दि.15- नागपूर-भंडारा मार्गावर बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 5-6 जण जखमी झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. बस लग्नाची वरात घेऊन चालली होती. मौदा पोलीस स्टेशनअंतर्गत शिंगोरी गावाजवळ हा अपघात घडला. या अपघातात विठाबाई तुकाराम झिलपे (वय 72 रा. प्लॉट नं. 35 विश्वकर्मानगर मानेवाडा रोड नागपूर), करूणा विजयराव खोंडे (वय 58 रा.शताब्दी चौक नागपूर), आनंद रमेशराव अठवले (वय 28 रामबाग ,नागपूर), सतिश जांभूळकर (वय 35 रा. गोंदिया) मृत्यू पावले.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे लग्न असल्याने नागपूरवरुन ट्रव्हल्सने वर्हाडी तिरोड्याला लग्न लावण्यासाठी पोचले होते.रात्री 10 वाजेच्या सुमारास लग्राची विधी पार पाडून 30 ते 35 नातेवाईक असलेली बस(क्र.MH 31 CQ 8548)ने नागपूरला परत जाण्यासाठी दि 15 फेबुवारीच्या पहाटे 02.30 वा. निघाली. ट्रव्हल्स् ट्रॅव्हल्स भंडारा वरून नागपूरला हायवे क्र. 53 वरून जात असताना पहाटे अंदाजे 4.45 वाजेच्या सुमारास मौदा (शिंगोरी) गावासमोर ट्रॅव्हल्स चालकाने रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनर (क्र MH49 AT-3855) ला मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅव्हल्सची डावी बाजू चिरल्या
गेल्याने ट्रॅव्हल्समधील 15 ते 20 प्रवाशी किरकोळ व गंभीर जखमी झाले. जखमींना भंडारा व नागपूर येथे दवाखान्यात हलविण्यात आले.




