38.9 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ ओबीसी जनगणनेच्या लढ्यात सविंधान मैत्री संघाचे गोंदिया शहरात जनजागरण मोहीम

ओबीसी जनगणनेच्या लढ्यात सविंधान मैत्री संघाचे गोंदिया शहरात जनजागरण मोहीम

0
29

गोंदिया,दि.18ः ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने गेल्या 5 फुबेवारीपासून “जनगणना २०२१ मध्ये ओबिसी कॉलम नाही म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही”या मुद्याला घेऊन ओबीसी जनगणना जागृती यात्रा काढण्यात आली असून 19 फेबुवारीला दुपारी 12 वाजता गोंदियाच्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक,प्रशासकीय इमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पर्वावर समारोप करण्यात येणार आहे.ओबीसी संघर्ष समिती,राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी सेवा संघ,ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघाच्यावतीने काढलेल्या या यात्रेचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बबलू कटरे हे करीत असून आठही तालुक्यातील गावामध्ये जाऊन ही यात्रा गोंदियात दाखल झाली आहे.
“जनगणना २०२१ मध्ये ओबिसी कॉलम नाही म्हणून आमचा जनगणनेत सहभाग नाही”अशी गर्जना करुन ओबिसीच्या सर्व संघटनाचे पदाधिकारी व अनेक सामाजिक संघटनेच्या महीला व पुरूषांनी खांद्याला खांदा लावून ओबिसीची जातनिहाय स्वतंत्र जनगणना व्हावी यासाठी घरोघरी जाऊन स्टिकर व पत्रक वाटण्याची मोहीम हाती घेतली आहे.ओबींसीची जनगणना होणे काळाची गरज असल्याने ओबीसी बांधवानी आपल्या अस्तित्वासाठी आज आपण लढलो नाही, तर येणारी भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही. आपल्या येणार्या पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ओबीसी जनगणनेसाठीच्या लढ्यात सहभागी व्हावे हा मंत्र समोर ठेवत गोंदियात संविधान मैत्री संघाच्यावतीने ओबीसी जनगणना जागृती अभियान मोहिम हाती घेण्यात आली आहे.

सविंधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे,पुरुषोत्तम मोदी, वसंता गवळी, सैय्यद कमर अली,राजहंस चौरे यांनी शहरातील अनेक वार्डात जाऊन ओबीसीच्या या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करुन जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. बोधिसत्व चौक कुंभारे, नाना चौक,बहुजन चौक, मुन्ना चौक- श्रीनगर, मदिना मश्जीद चौक,शितला माता मंदिर चौक,गौतम नगर, बाजपेयी चौक,कुंभारटोली,हुसैनी चौक रामनगर,सुर्याटोला चौक,खापर्डे कॉलोनी,कुड़वा चौक,पाल चौक,कन्हार टोली,महाराणी अवंतीबाई लोधी चौक रिंग रोड,मरार टोली बस स्टैंड,डॉ. आंबेडकर चौक,फुलचूर नाका,शास्त्री वार्ड,मंतर चौक,गोविंद्पूर,छाेटा गोंदिया,मामा चौक,श्री टाकिज चौक,गांधी प्रतिमा, जयस्तंभ प्रशासकीय भवन परिसरात जनजागृती केली.