गोंदिया,दि.18ःमुस्लिम मायनॉरिटी ट्रस्ट गोंदिया द्वारा मरार्तोली बायपास रोड गोंदिया येथे 16 फेब्रुवारी रोजी 43 जोड्यांचे 11व्या मुस्लिम इज्तेमाई निकाह कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून हजरत अल्लाहमा कारी पैज मोहम्मद (साऊथ आफ्रिका),गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, मुस्लिम मायनॉरिटी ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद असलम अली, अमीन मेनन, घनश्याम पानतवने, अशोक गुप्ता, सलीम रोकडिया, नवाज खान, त्रीलोक शेंडे, मोहम्मद जफर, जितेंद्र पंचबुद्धे, विमल असाटी, अमर वराडे इत्यादी मंडळी मंचावर उपस्थित होते. 43 नवविवाहित दांपत्यांना आशीर्वाद देताना आमदार विनोद अग्रवाल यांनी लग्न हे फक्त दोन व्यक्तींना जोडत नाही तर दोन कुटुंबांना जोडणारे संबंध आहे. लग्नाच्या माध्यमातून दोन कुटुंब बंधनात बांधले जाऊन दोन गाव जोडले जातात असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इरशाद अहमद कुरेशी हे होते तर शेख मेहमूद कुरेशी, इफ्तेखार खान गनी, हाजी नसीम शेख, शादाब शेख, मोहम्मद इरफान काजी, जहागीर सिद्दीकी अख्तरी, हाजी गुलाम कादीर खान, सय्यद जाकीर अली, सईम कुरेशी, लतीफ खान, मिर्झा तालीब बेग इत्यादी मंडळींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर साजिद खान यांनी केले तर आभार प्रदर्शन अहमद मनियार यांनी केले.
4 Attachments





