34.8 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home गुन्हेवार्ता दोन अपघातात 1 ठार , 3 जखमी

दोन अपघातात 1 ठार , 3 जखमी

0
449

गोंदिया दि ०३ :  भरधाव इंडिका कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सायकलस्वार तीन विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. ३) सकाळी १०.३० च्या सुमारास रावणवाडी-सावरी मार्गावर घडली.
मेघा बिसेन (वय १५), हिना लोकराम बघेले (वय १६) व प्राची बघेले (वय १४, तिघीही रा. सावरी ) अशी जखमीची नावे असून, त्या येथील जीईएस हायस्कूलच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी आहेत. यापैकी मेघा बिसेन हिची प्रकृती चिंताजनक आहे. तर गोंदियातील महाराष्ट्र बँकेजवळ ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारला सायंकाळी घडली.
इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. त्यामुळे शाळा सकाळपाळीत भरत आहेत. सावरी येथील मेघा बिसेन, हिना बघेले व प्राची बघेले या तिघी सायकलने सकाळी शाळेत गेल्या होत्या. दहा वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर त्या रावणवाडी येथून सावरीकडे सायकलने जात होत्या. याचवेळी रावणवाडीकडून गोंदियाकडे जाणाèया ए‘एच ३५- पी. ३२०६ क्रमाकाच्या इंडिका कारने तिघींनाही जबर धडक दिली. त्या सायकलखाली कोसळून जखमी  झाल्या. या घटनेत मेघा बिसेन हिच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तिला गोंदियाच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. घटनेनंतर घटनास्थळी गोळा झालेल्या जमावाने कारच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.