ओबीसी अस्मिता रथयात्रेला सुरुवात

0
122

चंद्रपूर,दि.०३: ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीला घेवून राष्ट्रीय ओबीसी महासंघ शासन दरबारी रेटा लावत आहे. याच मागणीला घेवून ओबीसी अस्मिता रथयात्रा (दि.२) वाजता कॉलेज चौकातून निघाली. या रथयात्रेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे यांनी उदघटन झेंडी दाखविली.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, बबनराव फंड, बबन वानखेडे, शामकांत लेडे, प्रा. विजय मालेकर, प्रा. अशोक पोफळे, रमेश ताजणे, सूर्यकांत साळवे, गणपती मोरे, विवेक खुटेमाटे आदी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते. ओबीसी चंद्रपूर जिल्हा अधिवेशनानंतर नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील अकरा युवक चंद्रपूर ते शिवनेरी पायदळ वारी करुन आले आहेत. याच टप्यातील हा एक उपक्रम आहे. सदर रथयात्रा २ मार्च पासून सुरु होत आहे. ही रथयात्रा जिल्हाभरात फिरणार आहे. २०२१ मध्ये होवू घातलेल्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी तथा याबाबत समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने ओबीसी अस्मिता रथयात्रा चंद्रपूर ये चिमुर काढण्यात आली आहे. या रथयात्रेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची चंद्रपूर जिल्हा शाखा, चंद्रपूर ओŸबीसी महिला शाखा, चंद्रपूर ओबीसी विद्यार्थी व युवक शाखा, चंद्रपूर ओबीसी अधिकारी-कर्मचारी शाखा यांचा सहभाग असणार आहे. सदर यात्रा स्थानिक जनता कॉलेज चौकातून दि.२ मार्चला निघाली असून बल्लारशाह मार्गे पोभुर्णा मुल (४ मार्च), गोंडपिपरी (५ मार्च), राजुरा (६ मार्च), जिवती (७ मार्च) कोरपणा (७ मार्च), भद्रावती (८ मार्च), वरोरा (११ मार्च), सिन्देवाही (१२ मार्च), सावली (१३ मार्च), नागभिड (१४ मार्च), ब्रम्हपुरी (१५ मार्च), या मार्गे १६ मार्चला क्रांतीभुमी चिमुर येथे यात्रेच्या समारोपाला चिमुर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे आदि उपस्थित राहणार आहेत. या रथयात्रेचे ओबीसी समाजात जनजागृती करण्यात येत असून ओबीसींची जातनिहाय जनगणनेसाठी जनतेतून दबाव तयार करण्यासाठी वातावरण निर्मिती करणार आहे. या रथयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शाखा चंद्रपूरने केले आहे.