शिक्षकांच्या प्रलqबत मागण्यांना घेऊन पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे आंदोलन

0
250

गोंदिया,दि.03- महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षकांच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मागण्यांना घेऊन २ मार्च रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन जिल्हापरिषदेसमोर करण्यात आले.या आंदोलनात संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर,विभागीय अध्यक्ष राजेश दरेकर,राज्यउपाध्यक्ष यादवकांत ढवळे,महिला उपाध्यक्ष दमयंती वैद्य,जिल्हा नेते नेतराम बिजेवार,जिल्हाध्यक्ष राजानंद वैद्य,सरचिटणीस हरिराम येळणे,उपाध्यक्ष पी.के.खोब्रागडे,महिला सरचिटणीस जयश्री सिरसाटे तसेच सर्व तालुकाध्यक्ष,सरचिटणीस,जिल्हा व तालुका पदाधिकारी सहभागी झाले होते.आंदोलनांनतर प्रभारी शिक्षणाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
त्या निवेदनात १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व कर्मचा?्यांना जूनी पेंशन योजना लागू करण्यात यावी.२३ ऑक्टोबर२०१७ च्या शासन निर्णयातील अट क्र. ४ रद्द करणे.सर्व विद्याथ्र्यांना गणवेश पुरविणे व खरेदीचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला देणे.ऑनलाईनची सर्व कामे बंद करून व्हाट्सअप्प आदेश बंद करणे.चकउखढ ची वसुली बंद करून मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ देणे.शा.पो.आ.धन्याचा पुरवठा शासनाने करून संपूर्ण नोंदीचे काम शिजविणाèया यंत्रणेकडे देणे व फक्त नियंत्रणाचे काम शाळेकडे देणे.सर्व विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करणे.शिक्षण सेवकांना तीन वेतनवाढी मंजूर करणे तथा अप्रशिक्षित वस्तीशाळा शिक्षकांना रुजू तारखेपासून सेवा ग्राह्य धरणे.सर्व उच्च प्राथमिक शाळांना विनाअट मुख्याध्यापक पद मंजूर करणे.शिक्षकांना जाब चार्ट ठरवून देणे.१५% प्रमाणे नक्षल भत्ता पूर्वलक्षी प्रमाणे लागू करणे.अतिरिक्त घरभाडे भत्ता ४६० रु. प्रमाणे थकबाकी सह अदा करणे.पदवीधर शिक्षक व उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांचे वेतानातील तफावत दूर करून एकस्तर वेतनवाढ लागू करणे.२ जानेवारी २००२ ते ३१ डिसेंबर २००२ पर्यंत लागलेल्या शिक्षकांच्या वेतानातील तफावत दूर करणे.चटोपाध्याय व निवडश्रेणी प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे.सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते जमा करून २०२० पर्यंतच्या पावत्या जमा करणे.१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षक कर्मचाèयांचे २००९ पासून ऊउझड हिशोब शासन हिस्यासह पावती रूपात देणे.विज्ञान विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे.सातव्या वेतन आयोगात ४२०० ग्रेड वेतन असणाèया ४३०० ग्रेड वेतन घेणाèया पदवीधर शिक्षकांचे वेतन कमी निघत असल्याबाबत. सातव्या वेतानातील त्रुटी दूर करणे.शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक यांचे रिक्त पदे त्वरित भरणे.४% सादिल अनुदान शाळांना त्वरित देणे.शालेय परसबाग अनुदान शाळांना त्वरित अदा करणे.शालेय क्रिडासत्र २०१९-२०२० चे अनुदान शाळांना अदा करणे.शाळेचे थकीत विद्युत देयक माफ करून पुढील देयक जि.प. ने भरणे.स्वयंपाकी मानधन ६०००/- रुपये करून नियमित१२ महिने देणे.जि.प. शिक्षण विभाग गोंदिया कडून निघणाèया प्रत्येक पत्राची प्रत संघटनेला देणे.न.प. प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करणे.केंद्रप्रमुख व शिक्षक यांचे २०१४ पासून जी.पी.एफ. पावत्या त्वरित देणे.जिल्ह्यांतर्गत बदली मध्ये हिंदी माध्यमाच्या शाळेतील मराठी माध्यम शिक्षकांना संधी उपलब्ध करून देणे.आंतरजिल्हा बदली शिक्षकांना एक वेतनवाढ लागू करणे आदी मागण्यांचा समावेश होता.आंदोलनात जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर,जिल्हाध्यक्ष राज कडव,सुभाष सोनवाने,महेंद्र चव्हाण,प्रवीण सरगर,शिक्षक सहकार संघटना विभागीय अध्यक्ष रवी अंबुले,सुरेंद्र गौतम,पी.एस.रहांगडाले,जिल्हा परिषद कर्मचारी व प्रशासन अधिकारी संघटनेचे पी.जी.शहारे संदीप तिडके ,शालेय स्वयंपाकी मानधन पोषण आहार संघटनेचे पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील अनेक संघटनांनी आमच्या धरणे आंदोलनाला भेट देऊन मार्गदर्शन केले.