
गोरेगाव,दि.07ः- गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाणेंतर्गंत येत असलेल्या आंबेतलाव येथे 6 मार्च च्या रात्री दरम्यान अज्ञाताकडून गजानन महाराजांच्या मुर्तीची विडबंना करण्यात आल्याची घटना आज 7 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण जाले आहे.गावामध्ये गजानन महाराजांचे मंदिर असून अज्ञाताने मुर्तीवरील डोके तोडून रस्त्याच्या कडेला आणून ठेवल्याचे दिसून आले.पोलिसांना लगेच घटनेची माहिती देण्यात आली असून पोलीस पथक आंबेतलाव येथे दाखल होण्यासाठी रवाना झाले आहे.विशेष म्हणजे याच पोलीस ठाणेंतर्गत काही दिवसापुर्वी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचीही विडबंना करण्यात आली होती.1400 लोकसंख्या असलेले हे आंबेतलाव गाव आहे.




