गोंदिया,दि.09: आगामी काही दिवसात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहे. याकरिता राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यांनी कामाला लागावे, पक्ष संघटन बळकट करुन तळागळातील नागरिकांपर्यंत पक्षाचे ध्येय धोरण पोहोचवून कामाला लागल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकत्र्यांनी पक्ष संघटनेसह सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व कामांना प्राथमिकता देण्याचे काम करावे असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा ७ मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. सभेत उपस्थित कार्यकत्र्यांना मार्गदर्शन करतारा जैन बोलत होते. सभेला मार्गदर्शक म्हणृन आमदार मनोहर चंद्रीकापुरे, राकाँचे नेते विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, विनोद हरिणखेडे, पंचम बिसेन, गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, अशोक गुप्ता,रमेश ताराम, प्रभाकर दोनोडे, किशोर तरोणे, देवचंद तरोणे, अशोक सहारे, कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, मनोज डोंगरे, लोकपाल गहाणे, केवल बघेले, प्रेम रहांगडाले, डॉ. अविनाश काशिवार, राजू एन. जैन, रवी मुंदडा, नीता रहांगडाले, सी.के. बिसेन, कमल बहेकार, लक्ष्मण चंद्रीकापुरे, तुकाराम बोहरे, आqदसह राकााँपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व उपस्थित होते.
याप्रसंगी पक्षाच्या आगामी वाटचाल, निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली. पक्ष बळकटीकरणावर कार्यकत्र्यांंनी जोर द्यावे असे आवाहन करण्यात आले. दरम्यान आ.मनोहर चंद्रीकापुरे यांनी कार्यकत्र्यांना संबोधित करुन मोलाचा सल्ला दिला. जनतेच्या कामाला प्राथमिककता देवून त्यांना विविध योजनांचा लाभ देवून मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम राकाँच्या कार्यकत्र्यांनी करावे असे आवाहन केले. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.





