36.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home गुन्हेवार्ता जुन्या वैमन्यातून मजुराची हत्या

जुन्या वैमन्यातून मजुराची हत्या

0
194

सालेकसा,दि.12::जुन्या वैमन्यासातून मजुराची हत्या झाल्याची घटना तालुक्यातील बिंझली येथे रंगपंचमी ११ मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारात घडली. निलेश धनसिंग लिल्हारे (२४) असे मृत मजुराचे नाव आहे. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी पन्नालाल भरतलाल लिल्हारे (३0), प्रकाश भरतलाल लिल्हारे व प्रविण ढेकवार (३५) रा. बिंझली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
निलेश व पन्नालाल हे हैदराबाद येथील एका बांधकाम कंपनीत मजूर म्हणून कार्यरत होते. चार महिन्यापूर्वी त्यांच्यात काही कारणावरुन वाद झाला होता. त्यावेळेस निलेश केलेल्या मारहाणीत पन्नालालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
या भांडणाचा राग पन्नालालच्या डोक्यात होता. दरम्यान ते दोघेही होळीचा सण साजरा करण्यासाठी स्व:गावी बिंझली येथे आले होते. दिवसा रंगपंचमीचा उत्सव साजरा केल्यावर रात्री ९ वाजताच्या सुमारास निलेश गावातील चौकातून एकटाच घरी जात असताना पन्नालाल व त्याचे सोबती प्रकाश व प्रविण यांनी यांनी निलेशला लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, यावेळी चौकात असलेल्या नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. या मारहाणीत निलेशचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन पन्नालाल, प्रकाश व प्रविणला अटक केली आहे. पुढील तपास सालेकसाचे ठाणेदार राजकुमार डुणगे करीत आहेत.