29.8 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ अर्जुनीमोरगाव तालुक्यातील आठवडी बाजार दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश

अर्जुनीमोरगाव तालुक्यातील आठवडी बाजार दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश

0
119

नवेगावबांध दिं.17:कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधक उपाययोजना म्हणून, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश तालुका दंडाधिकारी तथा अर्जुनी-मोर चे तहसीलदार यांनी बजावले आहे.ग्रामपंचायत नवेगावबांध ला 16 मार्च रोज सोमवारला दिलेल्या आदेशात, कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांनी दिले आहेत.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिनांक 19 मार्च व 26 मार्च रोज गुरुवार या दोन दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावे. अर्जुनी-मोर गावच्या तालुक्यामध्ये हे एकाच ठिकाणी होणारी गर्दी शासकीय समारंभ, मेळावे, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये.तसेच आठवडी बाजार ठेकेदारांनी आपल्या स्तरावर बाजार बंद ठेवावा.

त्याच प्रमाणे स्टेशनरी दुकान व अन्य वस्तू विक्रेता यांना आपल्या स्तरावर सुचना देऊन ग्रामपंचायतने तेही बंद ठेवण्यात यावे. जिथे बाजार भरतो तिथे जास्त गर्दी होऊ नये व गर्दी टाळण्यासाठी विक्रेत्यांना ग्रामपंचायत नवेगावबांध येथील मैदानावर मैदानावर, इतर शेतकरी भाजीपाला विक्रेत्यांना बसण्यासाठी आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कुठल्याही ठिकाणी गर्दी होऊ नये.

म्हणून आवश्यकतेनुसार मुंबई पोलीस अधिनियम 1951चे कलम 43( 1) फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 व साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 मधील खंड 2, 3, 4 या तरतुदीनुसार आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावा. असे आदेशात नमूद केले आहे.