29.8 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ कुडव्यातील त्या विहीरीकडे लक्ष द्या

कुडव्यातील त्या विहीरीकडे लक्ष द्या

0
158

गोंदिया,दि.18ः- तालुक्यातील कुडवा येथील वार्ड क्रमांक 3 मधील सार्वजनिक विहीर गेल्या अनेक वर्षापासून खड्याच्या रुपात झाल्याने तिथे कधीही कुठलीही घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी यामागणीचे निवेदन गटविकास अधिकारी जावेद इनामदार यांना देण्यात आले आहे.निवेदन देतेवेळी  पंचायत समिती सदस्य अखिलेश सेठ,राहुल मेश्राम,राजेश बंबार्डे,जलदीप खोबरागड़े,शैलेश मेश्राम,रंजीत रामटेके,आकाश वैद्य, खोबरागड़े, चैनुदास मेश्राम आदि नागरिक उपस्थित होते.