39.9 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home विदर्भ नागपूर जिल्ह्यातील सर्व देशी विदेशी दारुची दुकाने आजपासून बंद

नागपूर जिल्ह्यातील सर्व देशी विदेशी दारुची दुकाने आजपासून बंद

0
497
file photo

नागपूर,दि. १८ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्यातील आठवडीबाजार, चित्रपट गृहे, जलतरणतलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे व म्युझियम ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आधीच देण्यात आले होते.त्यात आज जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व देशी,विदेशी दारु दुकान तसेच शाॅपी आज 18 मार्चच्या सायकांळ 5 पाजेपासून 31 मार्चच्या 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये गुरांच्या व इतर बाजारांचा समावेश आहे.

१३ मार्च २०२० पासून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला असून त्याबाबतची नियमावली घोषित केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आले आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने जिल्ह्यातील देशी विदेशी दारुची दुकाने ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे सूचित करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत कळविण्यात आले आहे.