25.9 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्हयात 12 व्यक्ती हॉस्पीटल क्वारंटाईन देखरेखीखाली

भंडारा जिल्हयात 12 व्यक्ती हॉस्पीटल क्वारंटाईन देखरेखीखाली

Ø मुंबई, पुणे व इतर राज्यातून परत आलेल्या व्यक्तींची संख्या 3571

0
169

भंडारा,दि. 27 :- भंडारा जिल्हयातील विदेशातून परत एकही व्यक्ती जिल्हयात आलेले नसून शीघ्र प्रतिसाद पथकाने भेट दिलेल्यांची संख्या 44 झाली आहे. त्यापैकी दोन व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मध्ये भरती करण्यात आले आहे व दोन्ही रुग्णांचे घश्यातील नमुने मेयो हॉस्पीटल नागपूर येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहे. दोन व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईन देखरेखीतून सुट्टी देण्यात आली असून पाच व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आले आहे. हॉस्पीटल क्वारंटाईन देखरेखीत 12 व्यक्ती भरती आहेत.

 आतापर्यंत पुणे, मुबई व इतर राज्यातून 3 हजार 571 व्यक्ती आले असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. भंडारा जिल्हयामध्ये आजपावेतो एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. जिल्हयात संचारबंदी असल्यामुळे जवाहरनगर नाक्यावर बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्याकरीता चार चमु तयार करण्यात आली असून थर्मल स्कॅनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. जिल्हयाच्या सिमेवरती एकूण 9 चेक पोस्ट तयार करण्यात आले असून प्रत्येक चेक पोस्टवरती वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी आयसोलेशन वार्ड, आयसीयु व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भेट देवून आयसोलेशन वार्ड करीता अतिरिक्त 75 बेड व आयसीयु करीता 25 बेड तयार करण्याच्या सुचना दिल्या. आवश्यकता भासल्यास खाजगी दवाखान्यांकडून व्हेंटीलेटर घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास टी.बी. वार्ड येथे 20 बेडचे आयसोलेशन वार्ड तयार करण्यात येणार आहे.

व्हेंटीलेटर ट्रेनिंगची आवश्यकता असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व स्टॉफ नर्सेस मिळून एकूण 60 व्यक्तींना व्हेंटीलेटर ट्रेनिंगसाठी नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे.

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर सोशल डिस्टंसिंगची मार्किंग करण्याचे कार्य सुरु आहे.नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन कोरोनाला आळा घालण्यासाठी मीच माझा रक्षक  या संदेशाचे पालन करावे.

सर्व   सहवासितांना प्राऊड टू प्रोटेक्ट भंडारा होम क्वारंटाईन हे स्टॅम्प मारण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष दोन तयार करण्यात आले असून जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 07184-251222 व जिल्हा सामान्य रुग्णालय -क्रमांक 07184-252247 आणि  आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा क्रमांक 07184-252317 यावर संपर्क साधावा.