35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय अखेर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारले

अखेर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारले

0
27

blank

नवी दिल्ली- मनोहर पर्रीकर, जे.पी.नड्डा, मुक्तार अब्बास नकवी यांच्यासह २१ नव्या चेहèयांचा मंत्रिमंडळात समावेश करत पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार अखेर पार पडला. १४ राज्यमंत्री, चार कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्र्यांनी(स्वतंत्र प्रभार) यावेळी शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये रविवारी हा शपथविधीचा हा सोहळा पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या सर्व मंत्र्यांना शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचेसह केंद्रीय मंत्री, भाजपचे खासदार उपस्थित होते.

२१ नव्या मंत्र्यांचा समावेश

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह जे.पी.नड्डा, सुरेश प्रभू, वीरेंद्र सिंह चौधरी यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. बंडारू दत्तात्रेय, राजीव प्रताप रुडी, महेश शर्मा यांनी राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)पदाची शपथ घेतली. यासोबतच गिरिराज सिंग, मोहन कुंदारिया, सनवर लाल जट, हरिभाई पार्थीभाई चौधरी, राम कृपाल यादव, मुख्तार अब्बास नकवी, हंसराज आहिर ,डॉ. रामशंकर कटेरिया, वाय.एस.चौधरी (इंग्रजीमध्ये शपथ घेतली), जयंत सिन्हा, राजवर्धन सिंग राठोड, बाबूल सुप्रियो (इंग्रजीमधून शपथ घेतली), साध्वी निरंजन ज्योती, विजय सम्पला यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
शिवसेनेचा सहभाग नाही
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार कार्यक्रमास रविवारी शिवसेनेने मात्र अनुपस्थिती दर्शवली.

blank