विधानसभा अध्यक्षपदासाठी तिहेरी लढत

0
8

मुंबई- विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसने आपले उमेदवार उभे केल्याने तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून ज्येष्ठ आमदार हरिभाऊ बागडे, शिवसेनेकडून आमदार विजय औटीं तर काँग्रेसकडून आमदार वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.वर्षा गायकवाड या मुंबईतील धारावी मतदारसंघाच्या आमदार आहेत. तर विजय औटी हे पारनेरचे आणि हरिभाऊ बागडे हे फुलंब्रीचे आमदार आहेत.
विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड बुधवारी होणार आहे. यासाठी मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मात्र मुदत वाढवून देण्याबाबत शिवसेने सभागृहात गोंधळ घातल्याने ही मुदत तीन वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली होती.
याआधी विधानसभा अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही तर काँग्रेस आपला उमेदवार देईल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार न दिल्याने काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे.आता राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्ङ्मक्षाच्ङ्मा निवडणुकीत कुणाच्ङ्मा बाजूने जाते ङ्माकडे लक्ष लागले आहे.