गोंदिया,दि.20 : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. अशातच जिल्ह्यात अनेक संस्था गरजवंताच्या मदतीला धावले आहे. त्यातच पोवार समाज संघटनाही गरजवंताच्या मदतीला धावून आली असून समाज संघटनेच्या वतीने गरजवंताना अन्नधान कीटचे वाटप करणे सुरू झाले आहे.
संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे अनेक गरीब कुटुंबियांचे संसार उघड्यावर आले आहे. अशात गरजवंताना या कठीन काळात मदत मिळावी, यासाठी सर्वत्र धडपड सुरू आहे. शासन प्रशासनासह अनेक सामाजिक संस्था गरजवंताच्या मदतीला धावून आले आहेत. त्याच अनुषंगाने पवार समाज गोंदियाच्या वतीने अन्नधान्य वाटपाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. शहरासह ग्रामीण भागातही गरजवंताना समाजाच्या वतीने अन्नदान कीटचे वाटप करण्यात येत आहे. या मोहिमेत महेंद्र बिसेन, पंकज पटेल, छत्रपाल चौधरी, प्रविण (बिट्टू) बिसेन,बाबा बिसेन, ओमप्रकाश बिसेन, निरज पारधी, विपीन ठाकरे, राजेश बिसेन, राहुल बिसेन, योगी येडे, राज रहांगडाले, गुलाब ठाकुर, मोहित बिसेन, रजत गौतम, केतन तुरकर यासह अनेक स्वयंसेवक कामाला लागले आहेत.





