गोंदिया,दि.21- कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन आणि संचारबंदी करण्यात आली आहे. यामुळे रोज कमावून जिवन यापन करणारे गोरगरीब मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळातर्फे 10 गरजू परिवाराला राशन किट प्रदान करण्यात आले. तसेच कुंभारे नगर येथिल डॉ आंबेडकर सामाजिक भवन येथे थांबवण्यात आलेल्या बाहेर राज्यातील जनतेला जेवणाची व्यवस्था करून देण्यात आली. गरजू परिवाराला मदत म्हणून 25 किलो राशन तसेच वयक्तिक रित्या एस.पी. बोरकर परमात्मा नगर यांच्याकडून भीमजयंती निमीत्त 10 गरजू परिवाराला सोशल डिस्टेंस चा पालन करुन अन्नधान्य कीट प्रदान करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळातर्फे मदत करणा-यामध्ये व्ही.सी. गवळी, शंकर सपाटे, इश्वर वंजारी, डी. एस. मेश्राम, दिनेश गुप्ता, एस.बी. नगराळे, विजय मेश्राम, बडोले बाबू, मेश्राम गुरुजी, एल.आर. महारवाडे, एस टी शेन्ड़े, के.एस. वासनीक, यादव मेश्राम, के.टी. मटाले यानी सह्योग केला.
भीम जयंतीच्या वर्गणीतुन जयभीम जनजागृती मंडळातर्फे गौतमनगर बाजपाई वार्डात अन्न धान्य किट वाटप
गोंदिया:– लॉकडाउन व संचारबंदीच्या काळात कुणीही उपासी राहू नये म्हणुन भीम जयंतीच्या वर्गणीतुन जयभीम जनजागृती मंडळातर्फे गौतमनगर बाजपाई वार्डात 35 गरजुना अन्न धान्य किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी वार्डातील सम्यक सम्बूद्ध बुद्ध विहार येथील जयभीम जनजागृती मंडळाचे अध्यक्ष बाबुराव जनबंधू, सचिव अतुल सतदेवे, सहसचिव हंसराज बनसोड, कोषाध्यक्ष कार्तिक रामटेके, प्रेमलाल मेश्राम, राजहंस उके, जगने सोशल डिस्टेंसिंगचा पालन करित उपस्थीत होते.




