28.8 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ नियमबाह्य कर्मचारी वाहून नेणारी बस ताब्यात

नियमबाह्य कर्मचारी वाहून नेणारी बस ताब्यात

0
253

नागपूर,दि.23ः सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन करीत क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी वाहून नेणारी एका वंâपनीची बस वाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. ही कारवाई बुधवारी आठवा मैल परिसरात करण्यात आली.गोंडखैरी येथील मायक्रोपार्वâ
लॉजिस्टिक या कंपनीची एमएच-३१/डब्ल्यू-७९३२ क्रमांकाची बस कर्मचारी ने-आण करते. लॉकडाऊन काळात कंपनीच्या कामासाठी नियमानुसार संचालकांनी कंपनीमध्ये कर्मचारी ने-आण करण्यासाठी संबंधितांकडून अनुमती मिळविली. बसच्या काचेवर आवश्यक वैद्यकीय सेवा असे पत्रकदेखील लागलेले आहे. बुधवारी सकाळी १० वाजताच्या
सुमारास चालक संजय उमरे (४०), रा. सुरक्षानगर, दत्तवाडी हा नागपूरहून अमरावतीमार्गे वंâपनीचे कर्मचारी घेतघेत
जात होता.
दरम्यान सदर बसमध्ये सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन करून अधिक कर्मचारी वाहून नेले जात असल्याची
माहिती वाडी पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून आठवा मैल, डिपेâन्स गेटसमोर बस थांबवून तपासणी
केली असता बसमध्ये कर्मचारी अतिशय दाटीवाटीने बसलेले दिसून आले. प्रत्येक आसनावर व पूर्ण बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त असे एवूâण ५८ कर्मचारी बसलेले होते. काही तर चक्क चालकाच्या केबिनमध्येही बसलेले होते.