30.8 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home गुन्हेवार्ता दारूभट्टीवर धाड, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

दारूभट्टीवर धाड, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
332

गडचिरोली,दि.23ःचामोर्शी तालुक्यातील आष्टी हद्दीतील राममोहनपूर जंगल परिसरात टाकलेल्या धाडीत मोहफुल दारुसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई २२ एप्रिल राजी स्थानिक गुन्हे शाखेने पार पाडली. याप्रकरणी पाच आरोपीविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रापत माहितीनुसार चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या राममोहनपूर जंगल परिसरात अवैधरित्या मोहफुलाची दारु गाळली जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्‍यांना मिळाली. या माहिती आधारे एलसीबी पथकाने आज, बुधवारी राममोहनपूर जंगल परिसरात पंचासह पाहणी केली असता दारु विक्रेते विजय विश्‍वनाथ दास, अजय विश्‍वनाथ दास, मनोज माजी, सुशिल सुखदेव रॉय, जगदीश भयरंजन सिंकदर सर्व रा. राममोहनपूर ता. चामोर्शी हातभट्टी लावून मोहदारु गाळत असल्याचे निदर्शनास आले. मात्र या अवैधरित्या मोहफुलाची दारू गाळणार्‍यांना पोलीस पथक येण्याची चाहूल लागताच जंगलात पळून गेले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असताना घटनास्थळावरुन ८0 हजार रुपये किंमतीचे २00 लिटर क्षमतेचे मोहादारु भरलेले २ ड्रम, ४ लाख ४0 हजार रुपये किंमतीचे २२ नग प्लास्टिक ड्रम मोह सडवा, ८0 हजार रुपये किंमतीचे १00 कलो क्षमतेचे ८ नगर प्लास्टिक ड्रम मोहसडवा, २ हजार २00 रुपये किंमतीचे २00 लिटर क्षमतेचे २ नगर ड्रम व इतर साहित्य असा एकूण ६ लाख २ हजार २00 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे.