24 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home शैक्षणिक विद्यार्थ्यांना मुदतबाह्य मिरची पावडरचे शालेय पोषण आहारात वाटप

विद्यार्थ्यांना मुदतबाह्य मिरची पावडरचे शालेय पोषण आहारात वाटप

0
888

आमगाव,दि.24:-कोरोना पार्श्वभूमीवर सद्या संचारबंदी असल्याने गेल्या मार्च महिन्यापासून शाळांना सुट्या देण्यात आलेल्या आहेत.त्यातच गेल्या महिनाभरापासून शाळा बंद असल्याने व रोजगाराची साधणेही बंद असल्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून शाळेत असलेला शालेय पोषण आहार वितरणाचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.त्या अंतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाणा येथील विद्यार्थ्यांनाही शालेय पोषण आहारातंर्गत असलेले साहित्य वितरीत करण्यात आले.मात्र हे साहित्य वितरीत करतांना शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षकांनी त्या पाॅकेटवरील तारीख न बघताच वितरीत केल्याने मुदत संपलेले मिरची पावडरचे पॅकेट वितरीत झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे.तर काही पॅकेट हे केरकचर्यामध्ये फेकण्यात आल्याचे बघावयास मिळाले.विशेष म्हणजे रजिस्टरवर सुध्दा योग्य नोंद नसल्याचेही काही पालकांनी म्हटले आहे. तसेच काही विद्यार्थ्यांना पोषण आहार मधील कडधान्य देण्यात आले नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे .पोषण आहार वाटत असताना शाळा समितीचे अध्‍यक्ष संतोष वंजारी हे पोहोचले असता त्यांच्या निदर्शनात आले. तेव्हा वंजारी यांनी सरपंच अनिता आग्रे व पोलीस पाटील प्रदीप बावनथडे यांना माहिती देत मिरची पावडरचे पॅकेट हे मुदत बाहय असल्याचे दाखविले.त्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षकांनी मिरची पावडर पॅकेट वाटप करणे बंद केले.त्यानंतर याप्रकरणाची माहिती गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे व गटशिक्षणाधिकारी वाय.सी. भोयर यांना देण्यात आली.चौकशी दरम्यान मुलांना दिलेल्या मिरची पावडरचे पॅकेट मुदत बाहय असल्याचे निदर्शनास आले.तसेच शाळेमध्ये असलेला पोषण आहार व मिरची पावडरचा स्टाक मोजून किचन रूम वर स्टोअर रूमला अधिकार्यांच्या उपस्थितीत सीलबंद करून मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

blank