कोल्हापुर,दि.२९:भुदरगड तालुक्यामधील आकुर्डे येथे कोरोनाग्रस्त रुग्णाची टेस्ट पॉझिटीव्ह आल्याने आकुर्डे गावास भेट देवून प्रशासनाच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर, प्रांताधिकारी संपत खिलारी, तहसीलदार अमोल कदम, पोलीस निरीक्षक पतंगे यांच्यासह संबंधित अधिकार्यांनी उपस्थित राहून परिस्थीतीची माहिती घेतली. तसेच आकुर्डे गावासह परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी घटनास्थळी आरोग्य विभाग व संबंधीत यंत्रणेकडून आढावा घेतला. आकुर्डे सारख्या ग्रामीण भागामध्ये कोरोना व्हायरसचा रुग्ण सापडल्यामुळे मुक्तपणे संचार करणाऱ्या गावातील मंडळींनी याचा गांभीर्यपुर्वक विचार करण्याची गरज असून कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरीता प्रशासनाकडून येणाऱ्या सर्व सुचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले.सदर व्यक्ती मुंबईहुन आली असून त्यास तात्काळ क्वारंटाइन करण्यात आले होते,त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नसून काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रातांधिकारी संपत खिलारी यांनी म्हटले आहे.याप्रसंगी आकुर्डे तसेच परिसरातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याबाबत निर्देश दिले. कृपया नागरिकांनी घराबाहेर पडू नये. आपणास लागणाऱ्या योग्य सोई-सुविधा देण्यास प्रशासन कठीबध्द आहे.




